SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

शिवा शर्मा मृत्यू प्रकरण: श्रद्धा दुबेला नागपुरातून अटक! पोलिसांनी ठेवलं होतं 50 हजारांचं बक्षीस

9 ऑक्टोबर रोजी संशयास्पद परिस्थितीत शिवा शर्माच्या मृत्यूनंतर, आरोपी श्रद्धा दुबे तिच्या बहिणीसह आणि त्यांच्या चालकासोबत फरार झाली होती. श्रद्धा दुबेबद्दल माहिती देणाऱ्याला पोलिसांनी 50 हजारांचं बक्षीस जाहीर केले होते.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Oct 20, 2026, 05:40 PM IST | Updated: Oct 20, 2026, 05:47 PM IST
Image Credit: श्रद्धा दुबेला नागपुरातून अटक
Join

लखनऊमधील व्यावसायिक शिवा शर्माच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी अखेर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी मुख्य संशयित असणारी मॉडेल श्रद्धा दुबेला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी नागपुरातून तिला अटक केली आहे. श्रद्धा दुबे मागील 11 दिवसांपासून फरार होती. उत्तर प्रदेश एसटीएफने तिला ताब्यात घेतले. श्रद्धा दुबेसोबतच एसटीएफने तिचा चालक आणि तिची बहीण रश्मी दुबे यांनाही अटक केली आहे. याआधी, ती लखनऊ आणि आग्रा परिसरात असल्याची माहिती समोर आली होती. तिला मदत करणाऱ्या व्यक्तींचा आणि ती ज्या विविध ठिकाणी वास्तव्यास होती, त्या ठिकाणांचाही पोलीस तपास करत आहेत.

नागपूर दंडाधिकारी न्यायालयासमोर केले हजर

मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धा दुबेला आज नागपूरमधील दंडाधिकारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. त्यानंतर, पोलीस श्रद्धा दुबे, तिची बहीण आणि त्यांच्या चालकासह लखनौच्या दिशेने रवाना होतील. जर त्यांनी रेल्वेने आल्यास उद्या, 21 ऑक्टोबर रोजी लखनौला पोहोचतील, त्यानंतर तिला थेट न्यायालयात हजर केले जाईल. लखनौ पोलीस उद्या तिच्या कोठडीची ) मागणी करू शकतात. विशेष म्हणजे, श्रद्धा दुबे अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न करत होती, परंतु त्याआधीच तिला अटक करण्यात आली.

9 ऑक्टोबर रोजी चौथ्या मजल्यावरून पडला शिवा शर्मा
9 ऑक्टोबर रोजी हजरतगंज येथे एका चार मजली इमारतीवरून पडून शिवा शर्माचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. तो खाली पडल्याची घटना इमारतीबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. शिवा शर्माला केजीएमयू रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या आईने श्रद्धा दुबेवर त्याच्या हत्येचा आरोप केला आहे.

पोलिसांनी ठेवले होते 50 हजारांचे बक्षीस

सुरुवातीला पोलिसांनी श्रद्धा दुबेबद्दल माहिती देणाऱ्यासाठी 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, जे नंतर वाढवून 50 हजार करण्यात आले. श्रद्धा दुबेने काही व्हिडिओ जारी करून असा दावा केला की, शिवा शर्माचा मृत्यू ही आत्महत्या होती. याव्यतिरिक्त, 'एएनआय' ला दिलेल्या मुलाखतीत तिने शिवा शर्मावर 16 ते 17 लाख रुपयांचे कर्ज होते आणि सावकार पैशांची मागणी करत होते असा दावा केला. श्रद्धाच्या म्हणण्यानुसार, ती शिवाला चार महिन्यांपासून ओळखत होती.

अनेक बड्या व्यक्तींशी संबंध असल्याचे समोर

श्रद्धा दुबेचे अनेक व्हीआयपींशी संबंध असल्याचेही समोर आले आहे. तिचे अनेक फोटोही समोर आले आहेत. श्रद्धा आणि शिवा एकत्र राहत होते. शिवाच्या मृत्यूनंतर, श्रद्धाने एक जुना व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये शिवासारखा दिसणारा एक व्यक्ती दागिने चोरल्याची आणि ते विकल्याची कबुली देताना दिसत आहे. त्या व्हिडिओमध्ये तो व्यक्ती असेही म्हणतो की, तो लवकरच 6 लाख रुपयांचे देणे परत करेल.

Add Zee News as a Preferred Source

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES