SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

20 रुपयांसाठी 13 वर्षांच्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल, नागपुरातील घटनेने खळबळ

20 रुपयांसाठी 13 वर्षीय विद्यार्थ्याने जीवन संपवल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Oct 14, 2026, 10:07 AM IST | Updated: Oct 14, 2026, 10:09 AM IST
Image Credit: nagpur crime news
Join

रोजंदारीवर काबाडकष्ट करून संसाराचा गाडा हाकणाऱ्या आईकडे मुलाने शाळेत जाताना 20 रुपये मागितले. मात्र, आईने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर काहीही न बोलता घराबाहेर पडलेल्या मुलाचा काही तासांतच गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. ही काळीज पिळवटून टाकणारी घटना मंगळवारी नागपूर येथे सकाळी घडली.

नैतिक संजय दशमेर वय 13 आणि राहणार पथरई असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, या घटनेने सर्वजण सुन्न झाले आहे. नैतिक हा पथरई येथील नवजीवन हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिक्षण घेत होता. त्याचे आई-वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आई मागील आठ दिवसांपासून मजुरीच्या कामासाठी आमडी येथे जात होते. नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी नैतिक शाळेत जाण्यासाठी तयार झाला.

घराबाहेर पडताना त्याने आईकडे 20 रुपयांची मागणी केली. आईने पैसे कशासाठी हवेत, अशी विचारणा केली असता त्याने कारण सांगितले नाही. त्यामुळे आईने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर नैतिक काहीही न बोलता घरातून निघून गेला. सकाळी साडेअकराच्या सुमारास जवळील यांच्या शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला . ही बातमी समजताच कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे एका लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत नैतिक आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून नागरिकांच्या मदतीने मृतदेह खाली उतरविला. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले
याबाबत पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, कुटूंबियानी सांगितले कीं मुलाला 20 रुपये न दिल्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा त्यांचा अंदाज आहे. मात्र, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील अधिक तपास देवलापार पोलीस करीत आहे.

14 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील सोनसरी आश्रमशाळेतील 14 वर्षीय विद्यार्थिनीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. राणू कृष्णा हलामीच्या मृत्यूने खळबळ एकच खळबळ उडाली आहे. काही तासांपूर्वी राणूला भेटायला पालक शाळेत आले होते. राणूला त्यांच्यासोबत घरी जायचे होते. मात्र हट्ट करणाऱ्या राणूला खोलीत कोंडल्याचा आरोप अधिक्षिकेवर  करण्यात आलाय. घटना लक्षात आल्यावर राणूला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिचा मृत्यू झाला होता.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES