SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

दरोड्यातील संशयित आरोपीचा मृत्यू, जमावाच्या मारहाणीनंतर मृत्यू झाला आरोप, पोलिसांनी सांगितलं काय घडलं?

दरोड्यातील संशयित आरोपीला मृत्यू झाला आहे. जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावर पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Sep 30, 2026, 11:34 AM IST | Updated: Sep 30, 2026, 11:36 AM IST
Image Credit: Robbery Suspect Dies After Being Held by Locals
Join

नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दरोडा टाकणाऱ्या चोरट्याचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बेलतरोडी पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे.

दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास घरात डिलिव्हरी बॉयच्या रूपात दोन चोरटे घुसले. त्यांनी चाकूचा धाक दाखवत 62 वर्षीय वृद्ध महिलेला गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसुत्र हिसकावणाऱ्या त्या चोराला जमावाने शोधले आणि पोलिसात स्वाधीन केले. दरम्यान चोरट्यांनी पोलीसांना छातीत दुखत असल्याची तक्रार केली. तेव्हा त्याला मेडिकलमध्ये आणण्यात आले. दरम्यान डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे निदान केले. तर दुसरा चोरटा मात्र फरार झाला आहे.

बेलतरोडी परिसरात न्यू मनीष नगर मॉडेल कॉलनी परिसरातील न्यू मनीष नगर येथे उषा धार्मिक नावाच्या 62 वर्षीय वृद्ध महिला घरी होत्या. त्यावेळी दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास चोरटा सुमेध आणि त्याचा साथिदार हे दोघे डिलिव्हरी बॉय म्हणून त्यांचा घरात घुसले. या दोघांनी वृद्ध महिलेला चाकूचा धाक दाखवत तिच्या गळ्यातील दिड तोळ्याचे मंगळसुत्र हिसकावत पळ काढला.

दरम्यान महिलेने आरडाओरड केली. परिसरातील लोकांनी या चोरट्यांचा शोध घेत एका संशयिताला पकडले. त्यांनी झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा ड्रेसही बदललेला होता. त्यांनी चोरटा सुमेधला पकडून पुन्हा कॉलनीत आणले. इथे ज्यांच्याकडे लूट झाली होती त्या कुटुंबाने त्याला ओळखले.

संतप्त नागरिकांना त्याला चोप दिल्याचे बोलले जाते आहे. दरम्यान परिसरात तणाव पाहता कोणीतरी बेलतरोडी पोलिसांना माहिती दिली. बीट मार्शल घटनास्थळी पोहतच त्याला ठाण्यात आणले. पोलीस त्याची चौकशी करत असतानाच सुमेधने छातीत दुखत असल्याची तक्रार केली. पोलिसांनी त्याला मेडिकलमध्ये नेले. तिथे डॉक्टर तपासत त्याचा मृत्यू झाल्याचे निदान झाले.

पोलिस काय म्हणाले?

जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाल्याच अद्याप दिसून आले नाही. त्या चोरट्याच्या मृत्यूचे कारण अजून स्पष्ट नाही. एक्सीडेंटल डेट अननॅचरल डेथ म्हणून केस दाखल केली आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल मात्र सध्या तरी मोबलिंचिंगमुळे मृत्यू झाल्याचा समोर आलेल नाही. आम्ही सीसीटीव्ही फुटेज वगैरे सगळे तपासत असल्याचे पोलीस उपायुक्तांनी म्हटलं आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर या सगळ्या प्रकरणावर कारवाई केली जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES