SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

...म्हणून मी नागपूर-मुंबई 'दुरांतो'वर दगडफेक केली; आरोपीने सांगितलं धक्कादायक कारण! पोलिसही थक्क

या व्यक्तीने केलेल्या दगडफेकीमध्ये दुरांतो एक्सप्रेसच्या तीन डब्यांचं नुकसान झालं. हा सारा घटनाक्रम झाल्यानंतर पळून गेलेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची एक टीम तयार करुन तपास करण्यात आला. नेमका हा आरोपी कसा सापडला आणि त्याने या कृत्यामध्ये काय कारण सांगितलं जाणून घ्या...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Oct 01, 2026, 02:47 PM IST | Updated: Oct 01, 2026, 03:00 PM IST
Image Credit: या प्रकरणातील आरोपीला करण्यात आली अटक
Join

नागपूरवरून सुटलेल्या आणि मुंबईकडे येणाऱ्या दुरांतो एक्स्प्रेसवर दगडफेक करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीने वैयक्तिक कारणामधून आलेल्या निराशेमधून रेल्वेच्या मालमत्तेचं नुकसान केल्याचं समोर आलं आहे.  दुरांतो एक्स्प्रेसच्या तीन एसी कोचच्या काचा फोडणाऱ्या भामट्याला अजनी रेल्वे सुरक्षा दल आणि विशेष तपास शाखेने अटक केली आहे. अटकेनंतर त्याने या कृत्यामागील खरं कारण सांगितलं आहे.

आरोपीने सांगितलं कारण

नागपूरमध्ये दुरांतोवर दगडफेक करणाऱ्या व्यक्तीचं नाव नरेंद्र कुमार हिसाबीलाल सिरसाम असं असून तो 35 वर्षांचा आहे. नरेंद्र हा मूळचा मध्य प्रदेशमधील मंडला येथील नैनपूर तालुक्यातील रामगडीमध्ये राहणार आहे. तो बांधकाम मिस्त्री म्हणून काम करतो. कामानिमित्त तो पत्नीसह बोरखेडी परिसरात आला होता. अटकेनंतर बायकोशी भांडण झाल्यानंतर मद्यधुंद अवस्थेत आपण रागाच्या भरात दगडफेक केल्याची कबुली आरोपीने दिल्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारीही चक्रावले.

सीसीटीव्ही फुटेजने खुलासा

रेल्वे सुरक्षा दलाने दगडफेकीच्या घटनेची चौकशी केल्यानंतर बोरखेडी नगरपंचायतचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता घटनेच्या वेळी आरोपी रेल्वे रुळाकडे जाताना दिसला. तसेच दोन व्यक्तींनी तो घटनेच्या वेळी रेल्वे रुळाकडे जाताना पाहिल्याचे रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाला आरोपीविरुद्ध सबळ पुरावे मिळाले आहेत.

कसा सापडला आरोपी?

दुरंतोवर दगडफेक झाल्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाने चौकशी सुरू करून अज्ञात आरोपीविरुद्ध रेल्वे अॅक्ट 153, 147 नुसार गुन्हा दाखल केला. रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त मनोज कुमार यांनी या घटनेच्या तपासासाठी अजनी रेल्वे सुरक्षा दलाचे पथक गठित केले. पथकाने बोरखेडी रेल्वेस्थानक, ब्राह्मणी गाव व बुटीबोरी परिसरात तपास सुरू केला. पोलिस बोरखेडीत दगडफेकीची चौकशी करीत असल्यामुळे आरोपीने तेथून पलायन करून नागपूर शहरात बांधकाम मिस्त्रीकडे काम सुरू केले. आरोपी नागपुरात ऑटोमोटिव्ह चौकात असल्याची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दलाने त्यास बेड्या ठोकल्या.

नेमकं त्या दिवशी झालं काय?

25 सप्टेंबरला नरेंद्रचे पत्नीसोबत जोराचे भांडण झाले. रागाच्या भरात त्याने तीन वेळा मद्यपान केलं. त्यानंतर मद्यधुंद अवस्थेत तो रात्री साडेआठ वाजता बोरखेडी रेल्वेस्थानकाच्या बाजूला असलेल्या परिसरात आला. आरोपीने मोठमोठे दगड घेतले अन् दुरांतो एक्स्प्रेसवर भिरकावले. यात दुरांतो एक्स्प्रेसच्या ए 2, बी 1 आणि बी 5 या कोचच्या काचा फुटल्या. या घटनेमुळे संबंधित कोचमधील प्रवासी घाबरले. दुरांतो एक्स्प्रेस वर्धा रेल्वेस्थानकावर पोहोचल्यानंतर प्रवाशांनी घटनेची माहिती रेल्वे पोलिस व रेल्वे सुरक्षा दलाला दिली. अर्ध्या तासानंतर ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली होती.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES