SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

नाशिकमध्ये मजूर कुटुंबाला अघोरी स्नान, महिलेच्या डोळ्यात पिळला लिंबू, मुलीला 40 दिवस डांबून ठेवलं अन् नंतर...

आजारपण व कौटुंबिक अडचणी दूर करण्याचे आमिष दाखवत धुळ्यातील एका गरीब मजूर कुटुंबाची नाशिकमध्ये अघोरी पूजा व जादूटोण्याच्या नावाखाली तब्बल 1 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Sep 29, 2026, 07:19 PM IST | Updated: Sep 29, 2026, 07:24 PM IST
Join

आजारपण व कौटुंबिक अडचणी दूर करण्याचे आमिष दाखवत धुळ्यातील एका गरीब मजूर कुटुंबाची नाशिकमध्ये अघोरी पूजा व जादूटोण्याच्या नावाखाली तब्बल 1 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नाशिक येथे पीडित महिलेला अघोरी स्नान घालून तिच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळण्यात आल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, मांत्रिक महिलेसह साथीदारांना ताब्यात घेतलं आहे.


फसवणूक झाल्यानंतर पीडित महिलेने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधला. समितीच्या कार्यकर्त्यांनी पीडित कुटुंबाला धीर देत पोलिसांत जाण्याचे आवाहन केले. त्यानंतर 27 सप्टेंबर 2026 रोजी धुळे शहर पोलिस ठाण्यात अघोरी प्रथा व जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणात धुळे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत नाशिकमधून मांत्रिक महिला सरिता जाधव आणि तिच्या साथीदारांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. आरोपींवर विविध कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.

मुलीला डांबून जबरदस्तीने सारखपुडा

पीडितेच्या 21 वर्षीय मुलीवर दुर्धर आजाराचा प्रभाव असल्याचे सांगून मांत्रिक महिलेने तिला धुळ्यातील माहेरीच्या घरी सुमारे 40 दिवस ठेवण्यास भाग पाडल्याचे समोर आले. मुलीने आईच्या भीतीने लपून दिले, मात्र संकट टळेल असे सांगून तिला कुटुंबापासून दूर ठेवण्यात आले. त्यानंतर 24 जुलै 2026 रोजी मांत्रिक महिलेने मुलीला जबरदस्तीने साखरपुडा उरकून घेतल्याचा आरोप आहे.

त्यानंतर संशयितांनी पीडित कुटुंबाशी संपर्क तोडला. दरम्यान, मांत्रिक महिलेने पीडितेला गोदाघाटावर नेऊन अघोरी स्नान घातले. तिच्या अंगावरून उतारलेल्या लिंबाचा रस थेट डोळ्यात पिळल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास धुळे शहर पोलिस करीत आहेत.

 

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES