SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

22 मृत रुग्णांवर उपचार केल्याचं दाखवून सरकारला ₹2 कोटींचा गंडा, नाशिकच्या 3 हॉस्पिटलमधला घोटाळा; फडणवीसांनी घेतली दखल

नाशिकमधील आरोग्य क्षेत्रात खळबळ उडवून देणारी ही घटना समोर आल्यानंतर या प्रकरणामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लक्ष घातलं असून या प्रकरणामध्ये एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. नेमका हा घोटाळा झाला कसा जाणून घ्या...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Oct 10, 2026, 02:48 PM IST | Updated: Oct 10, 2026, 03:06 PM IST
Image Credit: फडणवीसांच्या आदेशानंतर मोठा निर्णय (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य - रॉयटर्सवरुन साभार)
Join

केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत आणि महाराष्ट्र सरकारच्या महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या नावाखाली नाशिकमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे. नाशिकमधील 3 हॉस्पिटल्सने 22 मृत रुग्णांच्या नावाने आर्थिक अपहार केला आहे. या रुग्णांच्या मृत्यूनंतर 6 वर्षांनी उपचार केल्याचं दाखवून सुमारे 2 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचं उघडकीस आलं आहे. आयुष्मान भारत आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना (जीवनदायी) अंतर्गत खोटे क्लेम्स सादर करून हा अपहार करण्यात आला.

नक्की केलं काय?

कोरोना काळात म्हणजेच 2020 ते 2022 दरम्यान मृत्यू झालेल्या 22 रुग्णांना जिवंत दाखवून त्यांच्या नावावर 6 वर्षांनंतर उपचार केल्याचे कागदोपत्री दाखवले गेले. वैद्यकीय कागदपत्रांमध्ये हेरफेर करून शासनाकडून तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी लाटला गेला. काही प्रकरणांत रुग्णांनी अन्यत्र उपचार घेतले होते किंवा उपचारच झाले नव्हते, असं तपासानंतर समोर आलं आहे.

गुन्हा दाखल

सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसचिव तथा स्टेट हेल्थ अ‍ॅश्युरन्स सोसायटीचे अधिकारी चंद्रकांत विभुते यांनी मुंबईतील वरळी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणामध्ये फसवणूक, विश्वासघात, बनावट कागदपत्रे इत्यादी संबंधित कलमांअंर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

ही रुग्णालये कोणती?

नाशिकमधील कोणत्या तीन रुग्णालयांनी आणि किती रुपयांचा अपहार केला ते पाहूयात...

> शिव मल्टिस्पेशालिटी व क्रिटिकल केअर हॉस्पिटल (सातपूर): सुमारे 163 क्लेम्स करुन 71 लाख 83 हजार रुपये लाटण्यात आले. यासाठी सात मृत रुग्णांची नावं वापरण्यात आली. या रुग्णालयाचे संचालक डॉ. त्रिलोक पाटील, राहुल पाटील होते.

> नाशिक ग्रेस हॉस्पिटल (सिडको): सुमारे 126 क्लेम्स करत या रुग्णालयाने सुमारे 62 लाख 13 हजार रुपयांचा अपहार करण्यात आला. यासाठी सात मृत रुग्णांची नावं वापरली गेली. रुग्णालयाचे संचालक तथा स्वाक्षरीकर्ता राहुल श्रीराम पाटील, सागर पाटील होते.

> ऋषिकेश हॉस्पिटल (गंगापूर रोड): या रुग्णालयाने सुमारे 72 क्लेम्स केले. त्यामधून सुमारे 45 लाख 45 हजार रुपये लुबाडण्यात आले असून त्यासाठी आठ मृत रुग्णांची नावं वापरण्यात आल्याचं समोर आलं आहे. या रुग्णालयाचे संचालक प्रशांत जाधव, प्रीतम पाचपुते होते.

एकूण 1 कोटी 79 लाख 42 हजार ते 2 कोटी रुपयांचा अपहार या तिन्ही रुग्णालयांनी केला आहे.

कारवाई काय?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यात हजारो संशयास्पद क्लेम्सची पडताळणी झाली होती; यापैकी अनेक प्रकरणे बनावट आढळली. काही संचालकांच्या प्री-अरेस्ट बेलला विरोध झाल्याचे समोर आले आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES