SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

नाशिक हादरले! चुलत भावाचे भयानक कृत्य; 14 वर्षाच्या मुलीने दिला बाळाला जन्म

14 वर्षीय अल्पवयीन मुलीची प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. या प्रकरणी चुलत भावाविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Oct 14, 2026, 04:01 PM IST | Updated: Oct 14, 2026, 04:02 PM IST
Join

नाशिक क्राईम न्यूज : बहिण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना नाशिकमध्ये घडली आहे.  नाशिकच्या चांदवड तालुक्यात अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. अवघ्या 14 वर्षे 16 दिवस वयाच्या मुलीने नवजात बालिकेला जन्म दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 

वडनेर भैरव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली  आहे. पीडित मुलीच्या चुलत भावाने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.  9 जानेवारी ते 27 सप्टेंबर 2026 या कालावधीत अत्याचार झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीस उपनिरीक्षक अमोल बी. पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अल्पवयीन मुलीच्या सुरक्षिततेचा आणि न्यायाचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

नवी मुंबईत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या 

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या झाल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.  मागील 3 दिवसांपूर्वी तुर्भे पोलिस ठाण्यात एक अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर पोलिसांनी पथक तयार करून तांत्रिक माहिती आणि सीसीटीव्ही तपासून एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन निर्घृण खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. तुर्भे पोलिसांनी आरोपीला नराधम आरोपीला अटक केली आहे. सदर आरोपी मयत मुलीच्या कुटुंबियांच्या ओळखीचा असून पोलिसांच्या नातेवाईकांनी आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी केली. तुर्भे पोलिसांनी दहा जणांचे एक पथक तयार केले असून संबंधित प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES