SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

नाशिकमध्ये शेतकऱ्याने संपवलं जीवन, सुसाइट नोटमध्ये सांगितलं काय घडलं?

राज्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतरही शेतकरी आत्महत्या करताना दिसत आहेत. नाशिकमध्ये कर्जाचा बोझा वाढल्याने शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Sep 29, 2026, 03:14 PM IST | Updated: Sep 29, 2026, 03:33 PM IST
Image Credit: नाशिकमध्ये शेतकऱ्याने संपवलं जीवन
Join

नाशिकच्या निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथील प्रगतशील शेतकरी संतू कचरू रायते यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

रायते हे खडक माळेगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन होते. त्यांच्यावर पत्नीचे दोन तोळे सोना तारण तसेच एक लाख 78 हजार रुपयांचे बँकेचे कर्ज होते विशेष म्हणजे, मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी कर्जाचा उल्लेख केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

कर्जमाफी योजनेत नाव आलेले असतानाही शेतकऱ्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत शेतकऱ्याजवळ सुसाईड नोट आढळून आली असून त्यात कर्जामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

राज्य शासनाकडून 265 दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात नाशिकचाही समावेश आहे. पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील कपाशी पिकाला मोठा फटका बसला आहे.

पावसाअभावी कपाशीची वाढ खुंटली असून बोंडधारणा अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. त्यामुळे उत्पादनाची शक्यता कमी झाल्याने उत्पादनापेक्षा काढणीचा खर्चही अधिक होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा आर्थिक पेच निर्माण झाला मुळे काही मालेगाव तालुक्यातील देवारपाडे येथील शेतकऱ्यांनी नाईलाजास्तव उभे कपाशीचे पीक उपटून फेकल असून पिकावर ट्रॅक्टर फिरवलं. त्याचा हजारो रुपयांचा खर्च पाण्यात गेला असून सरकारकडून आता त्यांना मदतीची अपेक्षा आहे.

अकोल्यातही शेतकऱ्याची आत्महत्या

राज्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतरही अकोला जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबताना दिसत नाही आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील सिंदखेड मोरेश्वर येथील शेतकऱ्याच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच, आता मूर्तिजापूर तालुक्यातील गाजीपूर येथे ४५ वर्षीय शेतकरी पुत्राने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES