SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

नाशिकमध्ये पोलिसालाच 20 दिवस डिजिटल अरेस्ट, मनी लाँड्रिंगची भीती दाखवत लुटले 71 लाख

काश्मीरमधील दहशतवादी कारवाया आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात नाव आल्याची भीती दाखवत सायबर भामट्यांनी नाशिकमधील एका सेवानिवृiत्त पोलीस कर्मचाऱ्याला तब्बल 20 दिवस डिजिटल अरेस्ट ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Oct 22, 2026, 06:13 PM IST | Updated: Oct 22, 2026, 06:17 PM IST
Image Credit: नाशिकमध्ये पोलिसालाच 20 दिवस डिजिटल अरेस्ट
Join

काश्मीरमधील दहशतवादी कारवाया आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात नाव आल्याची भीती दाखवत सायबर भामट्यांनी नाशिकमधील एका सेवानिवृiत्त पोलीस कर्मचाऱ्याला तब्बल 20 दिवस डिजिटल अरेस्ट ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी असल्याचे भासवत या भामट्यांनी 70 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. अटकेच्या भीतीने या सेवानिवृत्त पोलिसाने आपल्या खात्यातील पैसे आणि शेअर्स विकून तब्बल 71 लाख रुपये गमावले. विशेष म्हणजे, भामट्यांनी त्यांच्या बँक खात्यात एक रुपयाही शिल्लक ठेवला नाही. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर गुन्हेगारांनी आता थेट सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांनाच लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. दहा वर्षांपूर्वी पोलीस दलातून निवृत्त झालेल्या तक्रारदाराला 28 सप्टेंबर रोजी अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्यांनी सीमा रॉय, विक्रम सिंग आणि राकेश अग्रवाल अशी नावे सांगत आपण केंद्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी असल्याचे भासवले. काश्मीरमधील दहशतवादी कारवाया आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात तुमचे नाव आले आहे. तब्बल 70 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराशी तुमचा संबंध असल्याचा दावा करत आरोपींनी त्यांना अटकेची भीती दाखवली. त्यानंतर 28 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत त्यांना सतत व्हिडिओ कॉलवर ठेवण्यात आले. कॅमेरा बंद करू न देता त्यांच्यावर मानसिक दबाव टाकण्यात आला.

अटकेची भीती आणि बदनामीच्या धास्तीने सेवानिवृत्त पोलिसाने भामट्यांच्या सांगण्यावरून आपल्या बँक खात्यातील रक्कम काढली. एवढेच नव्हे, तर शेअर्सची विक्री करून मिळालेली रक्कमही आरोपींनी सांगितलेल्या खात्यांमध्ये पाठवली. अशा प्रकारे तब्बल 71 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकारात पीडिताच्या खात्यात एक रुपयाही शिल्लक ठेवण्यात आला नाही. घटनेची माहिती समोर आल्यानंतर सायबर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. संबंधित तीन बँकांना ईमेलद्वारे माहिती देण्यात आली असून, फसवणुकीची रक्कम पुढे ज्या ऑनलाइन खात्यांमध्ये हस्तांतरित झाली, त्या खात्यांची माहिती गोळा केली जात आहे. संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक काम करत असून, पैसे वळवण्यासाठी वापरण्यात आलेल्या म्यूल खातेदारांचीही चौकशी केली जात आहे

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीत आरोपी केवळ पैशांची मागणी करत नाहीत, तर पीडिताला मानसिकदृष्ट्याही पूर्णपणे खचवण्याचा प्रयत्न करतात. एकाकीपणा, समाजातील प्रतिष्ठा, नातेवाईकांमध्ये बदनामी होण्याची भीती, न्यायालयाचे समन्स आणि अटकेची धमकी अशा विविध मार्गांनी दबाव निर्माण केला जातो. स्काईप आणि सिग्नलसारख्या अॅपवर व्हिडिओ कॉल करताना पोलिसांचा गणवेश, सीबीआयचे बनावट कार्यालय आणि तपास यंत्रणांसारखे दिसणारे वातावरण तयार केले जाते. त्यामुळे समोरची व्यक्ती खरोखरच सरकारी अधिकारी असल्याचा अनेकांना विश्वास बसतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिक अशा मानसिक दबावाला बळी पडण्याची शक्यता असते, असे सायबर तज्ज्ञ सांगतात

लक्षात ठेवा, कोणतीही तपास यंत्रणा व्हिडिओ कॉलवर एखाद्या व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून ठेवत नाही किंवा अटकेची भीती दाखवून पैसे हस्तांतरित करण्यास सांगत नाही. अशा प्रकारचा फोन आल्यास घाबरून न जाता कोणतीही आर्थिक माहिती किंवा ओटीपी देऊ नका. संशयास्पद कॉल तातडीने खंडित करून जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधा. सायबर आर्थिक फसवणूक झाल्यास त्वरित 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा. 71 लाखांची लूट... 20 दिवसांचा मानसिक छळ... आणि खात्यात एक रुपयाही शिल्लक नाही! डिजिटल अरेस्टच्या नावाखाली सुरू असलेल्या सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याची वेळ आता आली आहे.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES