विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार; संपूर्ण प्रकरण समजल्यावर पोलिसही चक्रावले
धुळ्यात एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. एका विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार झाला आहे. आरोपींचे भयानक कृत्य पहाून पोलिसही हादरले आहेत.
धुळे क्राईम न्यूज : विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना धुळ्यात घडली आहे. पीडित महिलेचे आक्षेपार्ह फोटो काढले. नवऱ्याला फोटो दाखवतो” म्हणत धमकी देत तिघांनी या महिलेवर अत्याचार केला आहे. महिलेच्या तक्रारीनंतप पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
धुळे शहरातील रामदेव बाबा नगर परिसरात एका विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा गंभीर आरोप समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात विविध कलमन्वये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या कथनानुसार 30 तारखेला सकाळी कामावर जात असताना तिची प्रकृती बिघडली. डोके-पोट दुखणे आणि चक्कर येत असल्याने तिने एका अनोळखी व्यक्तीकडे लिफ्ट मागितली. त्या व्यक्तीने तिला मदत म्हणून लिफ्ट दिली.
दरम्यान, काही जणांनी महिलेला त्या व्यक्तीसोबत पाहिल्यानंतर दोघांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेतला. त्यानंतर महिलेचे संबंधित व्यक्तीसोबत फोटो काढून “हे फोटो तुझ्या नवऱ्याला दाखवतो,” अशी धमकी देत तिला ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे.महिलेच्या म्हणण्यानुसार, घरात कोणी नसल्याची संधी साधून आरोपींनी तिच्यावर जबरदस्ती केली. तसेच घटनेचा व्हिडिओ तयार करून त्याद्वारे ब्लॅकमेल करण्यात आले आणि पैसेही घेतल्याचा आरोप तिने केला आहे.
या प्रकरणात महिलेने साहिल, बाबू आणि अबू बकर अशी नावे सांगितली असून, पोलिसांच्या अधिकृत नोंदीनुसार आरोपी म्हणून साहिल हबीब पिंजारी, बाबू इरफान शाह आणि समद शेख जब्बार यांची नावे नमूद आहेत. पोलिस अधिकाऱ्यांसह सामाजिक-राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती प्रकरण समोर आल्यानंतर आझादनगर पोलीस ठाण्यात धुळे जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे आणि आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पाटील यांच्यासह सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पीडित महिलेने आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.