SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

172 वर्षांचा इतिहास असलेल्या नगर परिषदेचे नामांतरण करणार, ब्रिटिशकालीन नाव बदलणार

172 वर्षांचा इतिहास असलेल्या नगर परिषदेचे नाव आता अधिकृतपणे बदलून करण्यात येणार 'त्र्यंबकेश्वर नगर परिषद'

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Sep 30, 2026, 12:48 PM IST | Updated: Sep 30, 2026, 12:51 PM IST
Image Credit: The name of the city council with a history of 172 years will now be officially changed
Join

172 वर्षांचा इतिहास असलेल्या नगर परिषदेचे नाव आता अधिकृतपणे बदलण्यात येणार आहे. ब्रिटिश सरकारने सन 1854 मध्ये स्थापन केलेल्या या नगर परिषदेच्या नावबदलाचा ऐतिहासिक ठराव 28 सप्टेंबर 2026 रोजीच्या सभेत एकमताने मंजूर करण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यातील त्रिंबक नगर परिषदेचे नाव अधिकृतपणे बदलून आता 'त्र्यंबकेश्वर नगर परिषद' करण्यात येणार आहे. या नगर परिषदेला तब्बल 172 वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. पत्रव्यवहार आणि ऑनलाइन माहिती सादर करताना 'त्रिंबक' नावामुळे होणारी अडचण दूर करण्यासाठी घेण्यात आला हा महत्त्वपूर्ण निर्णय.

त्रिंबक नगर परिषदेची स्थापना ब्रिटिश काळात झाली होती. भगवान शिवशंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरामुळे आणि गोदावरी नदीच्या उगमस्थानामुळे (ब्रह्मगिरी पर्वत) या शहराला देशभरात अनन्यसाधारण धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व आहे. प्रत्यक्षात देश-विदेशात हे स्थान 'त्र्यंबकेश्वर' म्हणून ओळखले जात असले तरी शासकीय कामकाजात 'त्रिंबक' असाच  उल्लेख होत होता.

या क्षेत्राचे मूळ धार्मिक आणि सांस्कृतिक वैभव अधिकृत दप्तरी ठळकपणे अधोरेखित व्हावे, यासाठी नगर परिषदेचे नाव 'त्र्यंबकेश्वर' करण्याची मागणी अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिक आणि भाविकांकडून केली जात होती. या ऐतिहासिक निर्णयामुळे आता शासकीय दप्तर, अधिकृत दस्तऐवज आणि फलकांवर 'त्रिंबक' ऐवजी अधिकृतपणे 'त्र्यंबकेश्वर नगर परिषद' असा उल्लेख केला जाईल. नावबदलाची सूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर सर्व शासकीय नोंदी आणि नामफलकांवर 'त्र्यंबकेश्वर नगर परिषद' असाच अधिकृत उल्लेख केला जाणार आहे.

रामायणातील प्रसंगाचा दिव्य अनुभव येणार

नाशिकच्या धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी आडगावमध्ये रामायण थीम पार्क साकारण्यात येणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भाविकांना रामायणातील विविध प्रसंगांचा दिव्य अनुभव घेता येणार आहे. रामायण थीम पार्क महापालिकेच्या आडगाव येथील सर्व्हे क्रमांक 772 मधील राखीव जागेवर हा भव्य प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. महापालिकेवर अतिरिक्त आर्थिक भार न टाकता सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या (पीपीपी) तत्त्वावर हा प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे नाशिकच्या धार्मिक ओळखीला आणि पंचवटीच्या महात्म्याला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळणार आहे. रामायणातील प्रभू श्रीराम यांचे बालपण, अयोध्याकांड, अरण्यकांड, सुंदरकांड आणि युद्धकांड यातील प्रसंग अत्याधुनित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साकारले जाणार आहेत. त्यामुळं भाविकांना आणि पर्यटकांना रामायणातील पात्रांचा लाइव्ह अनुभव घेता येणार आहे. रामायणातील आदर्श, प्रभू श्रीरामांचे जीवनचरित्र वनवासातील प्रसंगहे सुद्धा पर्यटकांना अनुभवता येणार आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES