SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

वर्षाचे 365 दिवस, सकाळी 8 ते रात्री 8, तब्बल 12 तास भरणारी महाराष्ट्रातील अनोखी शाळा

एका छोट्याशा शाळेने हा सगळा समजच खोटा ठरवलाय. एक अशी शाळा जिथे सुट्टी हा शब्दच अस्तित्वात नाही. जिथे मुलं रविवारीही आनंदाने शाळेत जातात आणि चक्क 365 दिवस शिक्षणाचे धडे गिरवतात. पाहूयात, नाशिकमधल्या एका सुपर-स्कुलची ही प्रेरणादायी गोष्ट.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Oct 05, 2026, 10:23 PM IST | Updated: Oct 05, 2026, 10:35 PM IST
Join

योगेश खरे, झी 24 तास, नाशिक : जिल्हा परिषदेची शाळा म्हटलं की अनेकदा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती एक नकारात्मक प्रतिमा आणि भौतिक सुविधांची वानवा. पण, आज आम्ही तुम्हाला अशा एका गावात घेऊन जाणार आहोत, जिथल्या एका छोट्याशा शाळेनं हा सगळा समजच खोटा ठरवलाय. एक अशी शाळा जिथे सुट्टी हा शब्दच अस्तित्वात नाही. जिथे मुलं रविवारीही आनंदाने शाळेत जातात आणि चक्क 365 दिवस शिक्षणाचे धडे गिरवतात. नाशिकमधल्या एका सुपर-स्कुलची ही प्रेरणादायी गोष्ट.

अब्ज आणि खर्गमधील आकडेवारी सहज म्हणणारी ही बालवाडीतली चिमुकली एकाच वेळेस दोन्ही हातांनी लिहिणारी ही मुलं. दोनशेपर्यंतचे पाढे पाठ. अक्षर ओळख होण्याच्या वयात हे चिमुकले विद्यार्थी इतके हुशार कसे? तर ही मुलं आहे हिवाळी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतली.

400 पर्यंत पाढे, भारतीय संविधानाची सर्व कलमे आणि... सगळं तोंडपाठ

नाशिकच्या त्र्यंबकेश्वरपासून 40 किलोमीटर दूर डोंगरदऱ्यांच्या आणि निसर्गाच्या कुशीत लपलेल्या या गावात पायाभूत सुविधांची आजही इथे वाणवा आहे, पण याच गावात शिक्षणाचा एक मोठा चमत्कार घडतोय. इथली जिल्हा परिषदेची शाळा चक्क वर्षाचे 365 दिवस, सकाळी 8 ते रात्री 8 अशी तब्बल 12 तास भरते. आणि विशेष म्हणजे, मुलं कंटाळत नाहीत, तर शिक्षणात रमत आहेत.इथली पहिली ते पाचवीची मुलं पाहिली की त्यांची शैक्षणिक गुणवत्ता भल्याभल्यांना चकित करते. या चिमुकल्यांना चक्क 400 पर्यंतचे पाढे सहज तोंडपाठ आहेत. भारतीय संविधानाची सगळी कलमे, राष्ट्रीय महामार्ग आणि जगभरातल्या देशांच्या राजधान्या ते पुस्तक न पाहता सांगतात.

केशव सरांच्या मेहनतीचं फळ

या जादूमागे एक अवलिया आहे... त्यांचं नाव शिक्षक केशव गावित. लहानपणी पोटापाण्यासाठी त्यांनी मार्केट यार्डात अवघ्या 40 रुपये रोजाने हमालीदेखील केली. घरात 2013 सालापर्यंत विजेचा दिवा नव्हता, म्हणून चिमणीच्या प्रकाशात अभ्यास करत त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. पण यशाने त्यांना हुलकावणी दिली. मनातली हीच तगमग आणि आपलं अपूर्ण राहिलेलं स्वप्न त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये पाहिलं.  केशव सरांच्या या मेहनतीचं फळ आज या शाळेत दिसतंय. अगदी बालवाडीत असल्यापासूनच त्यांच्याकडून वाचन-लेखन आणि कर्स्यू रायटिंग करून घेतलं जातं. ही मुलं चक्क इंग्रजीतून बोलतात आणि स्पर्धा परीक्षेचीही तयारी करत आहेत. ही शाळा फक्त पुस्तकी किडे घडवत नाही, तर विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने जगण्याची कौशल्ये शिकवतेय. रोजगारभिमुख शिक्षणावर भर देत इथल्या मुलांनी पेंटिंग, फिटर, प्लंबिंग इलेक्ट्रिशियन आणि अगदी वेल्डिंग, शिवणकाम, गवंडीकाम, शेतीकाम अशी कौशल्ये आत्मसात केली आहेत

शाळेला शिक्षण पर्यटनाचा दर्जा देण्याची मागणी

ज्ञानाची भूक आणि शिक्षकाची दुर्दम्य इच्छाशक्ती असेल, तर डोंगरदऱ्यातही शिक्षणाची गंगा कशी पोहोचू शकते, याचं हे हिवाळी गाव म्हणजे एक जिवंत उदाहरण आहे. शिक्षण विभागांना आता या शाळेला शिक्षण पर्यटनाचा दर्जा देत सर्व लोकांनी इथे भेट देण्याचा आवाहन केले आहे केशव गावितंसारख्या एका हाडाच्या शिक्षकाने, कोणत्याही सुविधेची वाट न पाहता, या दोनशे लोकसंख्येच्या गावातून संपूर्ण राज्याला एक नवा आदर्श घालून दिला आहे. आज ही मुलं स्वतःचं आणि स्वतःच्या गावाचं भविष्य आपल्याच हातांनी लिहित आहेत. गरज आहे आपल्यासारख्यांनी त्याला साथ देण्याची. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES