SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

पुण्यातील हिंजवडी आणि चाकण परिसराबाबत सर्वात मोठी अपडेट; 1400 कोटींचा निधी मंजूर

पुणे : भारतातील दुसऱ्या क्रमाकांचे सर्वात मोठे IT हब आणि भारतातील सर्वात मोठं ऑटो हब पुण्यात आहे. पुण्यातील हिंजवडी IT पार्क आणि पुण्यातील चाकण MIDC च्या माध्यमातून सरकारला कोट्यावधी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र, हिंजवडी आणि चाकण परिसरात सुविधांचा अभाव आहे. यामुळे   हिंजवडी IT पार्क मधील कर्मचारी रसत्यावर उतरले. तर, चाकण MIDC मधील उद्योजकांनी स्थलांतराची घोषणा केली. यानंतर सरकाने हिंजवडी आणि चाकण परिसरातील समस्यांची गांभीर्याने दखल घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंजवडी आणि चाकण परिसराच्या सुधारणेसाठी मोठी घोषणा केली आहे.  1826 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. 

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Sep 29, 2026, 05:55 PM IST | Updated: Sep 29, 2026, 06:01 PM IST
Join

पुणे : भारतातील दुसऱ्या क्रमाकांचे सर्वात मोठे IT हब आणि भारतातील सर्वात मोठं ऑटो हब पुण्यात आहे. पुण्यातील हिंजवडी IT पार्क आणि पुण्यातील चाकण MIDC च्या माध्यमातून सरकारला कोट्यावधी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र, हिंजवडी आणि चाकण परिसरात सुविधांचा अभाव आहे. यामुळे   हिंजवडी IT पार्क मधील कर्मचारी रसत्यावर उतरले. तर, चाकण MIDC मधील उद्योजकांनी स्थलांतराची घोषणा केली. यानंतर सरकाने हिंजवडी आणि चाकण परिसरातील समस्यांची गांभीर्याने दखल घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंजवडी आणि चाकण परिसराच्या सुधारणेसाठी मोठी घोषणा केली आहे.  1826 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. 

चाकणमधील रस्ते, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्थापन, पावसाळी पाणी निचरा व्यवस्थापन आदी समस्या तातडीने सोडवल्या जाणार आहेत. यासाठी 1400 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. तर, हिंजवडीतील वाहतूक कोंडीची समस्या सोडण्यासाठी 426 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत  हिंजवडी आणि चाकण परिसराच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अंमलबजावणी यंत्रणा उभारण्याचे नियोजन आहे. AI च्या माध्यामातून  चाकण, तळेगाव आणि हिंजवडी परिसरातील वाहतूकीचे व्यवस्थापन केले जाणार आहे. 

चाकणसाठी 1400 कोटींचा निधी

चाकणमधील पायाभूत सुविधा विकासासाठी एमआयडीसी, पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद आणि अन्य संबंधित यंत्रणांना एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  चाकण औद्योगिक परिसरात पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या सोडवण्यासाठी नैसर्गिक नाले मोकळे करणे, रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था उभारणे, कल्व्हर्ट आणि पुलांची क्षमता वाढविणे तसेच आवश्यक ठिकाणी पाणी साठविण्याची व्यवस्था उभारण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातून मोठ्या संख्येने कामगार आणि नागरिक चाकणमध्ये  येतात. त्यामुळे खासगी वाहनांची प्रचंड गर्जी होत असून वाहतूक कोंडी निर्माण होते. चाकणकडे जाणाऱ्या कामगारांसाठी मार्गनिहाय बससेवेचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. खाजगी वाहनांची संख्या कमी करण्यासाठी 500 अतिरिक्त बसेसची सेवा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.  चाकण औद्योगिक परिसरातील पाणीपुरवठा योजनेचे काम 2027 मध्ये पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे. सध्या चाकण इंडस्ट्री असोसिएशनमार्फत सुरू असलेली पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे (एमजीपी) सोपविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.

हिंजवडीसाठी 426 कोटींची तरतूद

चाकण प्रमाणेच हिंजवडीतील समस्या सोडवण्यासाठी 426 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.  वाहतूक कोंडी ही हिंजवडीतील सर्वात मोठी आणि गंभीर समस्या आहे.  हिंजवडी परिसरातील कचरा व्यवस्थापनासाठीही पिंपरी-चिंचवड महापालिका किंवा पुणे महापालिकेच्या माध्यमातून कचरा संकलन सुरू करण्यात येणार आहे.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES