SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

पुण्यात पुन्हा डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला; 2 जणांच्या मृत्यूनं पालिका अलर्ट मोडवर

पुण्यात डेंग्यू आजारामुळे दोन जणांचा मृत्यू झाला. मृत्यूंना पालिका प्रशासन जबाबदार असून आरोग्य विभागाचं दुर्लक्ष होत असल्याचाही आरोप प्रशांत जगताप यांनी केला.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Oct 25, 2026, 11:51 PM IST | Updated: Oct 25, 2026, 11:55 PM IST
Join

पुणे न्यूज : पुण्यात डेंग्यू रोगाच्या साथीमुळे एका मुलीसह दोन जणांचा मृत्यू झाल्याने पालिका प्रशासन खडबडून जागं झाल आहे. डेंग्यू बाधीत भागात औषध फवारणीही सुरू झालीय. पण आता याच डेंग्यूच्या साथीवरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीकाही करू लागले आहेत.

पावसाळा संपला की साचलेल्या पाण्यात डेंगी डासांची पैदास वाढून सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात तशीही डेंग्यू पेशंट्ची संख्या दरवर्षी वाढत आणि थंडी पडताच कमीही होते असं तज्न डॉक्टर सांगतात. पण यंदा अलनिनो च्या प्रभावामुळे ऑक्टोबर हिट जरा जास्तच वाढली आणि पुण्यात डेंग्यू डासांचे प्रमाणही वाढलं. विशेष करून नगररोड, बाणेर परिसरात डेंग्यू पेशंट्ची संख्या सर्वाधिक आढळून आली. लोहगाव आणि गोखलेनगरमधे तर दोन डेंग्यू संशयित पेशंट्सचा उपचारादरम्यान मृत्यूही झाला.

पण पालिका माञ, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदाची डेंग्यू पेशंट्सची संख्या निम्याने कमीच असल्याचा दावा करण्यात धन्यता मानत आहेत. डेंग्यूचा पार्दुभाव झालेल्या भागात धूळ फवारणी केल्याचाही दावा पालिकेनं केला. दरम्यान, पालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी डेंग्यूची साथ वेळीच रोखण्यात काळजी न घेतल्यानेच आज दोघांचे बळी गेल्याचा आरोप विरोधकांनी केला.

पालिका आयुक्तांनी बाणेरमधील नायडू संसर्ग रूग्णालयासह रूबी हॉस्पिटल मध्ये जाऊन रूग्णांची पाहणी केली आणि डेंग्यू रूग्णांची वेळीच माहिती पालिकेला न कळवल्याबद्दल संबंधित हॉस्पिटल्सना नोटीलाही धाडल्यात. पुण्यात आजमितीला 50 अधिक डेंग्यू पेशंट्स विविध रूग्णालयात उपचार घेताहेत तर शहरभरातील क्लिनिकमधून 2191 डेंग्यू पेशंट्सची नोंद झालीय त्यातील एकट्या ऑक्टोबर महीन्यात 500 रूग्णांची वाढ झाली.म्हणूनच दिवसा चावणाऱ्या डेंग्यू डासांपासून स्वत:चा कसा बचाव करावा, याची माहिती आरोग्य प्रमुखांनी दिली.

पुण्यात 2024 साली 4908 तर 2025 साली 2391 डेंग्यू पॉजिटिव्ह रुग्णांची नोंद झाली होती. 2026 साली म्हणजेच यंदा तीच संख्या 20 ऑक्टोबर पर्यंत 2291 पर्यंत पोहोचली.याचाच अर्थ दरवर्षी पुण्यात पावसाळा संपला की डेंग्य साथ ही येतेच मग पालिकेनॆ वेळेत फवारणी का करून घेतली नाही? असाही सवाल विरोधक विचारताहेत. म्हणूनच इथून पुढे तरी बाधित रूग्ण सापडण्याची वाट न बघता पालिकेनं शहरात सगळीकडेच धूळ फवारणी करून डासांची उत्पत्ती रोखावी, अशी मागणी पुणेकर करत आहेत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES