SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

लोणावळ्यात एकाचवेळी 20 जणांविरोधात गुन्हा दाखल; एका व्हिलामध्ये सुरु होता अत्यंत धक्कादायक प्रकार

लोणावळ्यात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणी 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Oct 17, 2026, 08:53 PM IST | Updated: Oct 17, 2026, 08:55 PM IST
Join

लोणावळा क्राईम : पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यात एका व्हिलामध्ये सुरु होता अत्यंत धक्कादायक प्रकार सुरु होता. बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून लोकांची फसवणूक केली जात होती. पोलिसांनी मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला असून या प्रकरणी 20 लोकांना अटक करण्यात आली आहे. 

लोणावळ्यात विदेशी नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या कथित बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील लोणावळा हद्दीतील नांगरगाव येथील ओमेगा सोसायटी परिसरातील एका व्हिलामध्ये हे कॉल सेंटर सुरू असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी 20 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, लॅपटॉप, मोबाईल, वाहने आणि रोख रकमेसह 36 लाख 41 हजार 30 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या फिर्यादीनुसार, आरोपी अमेझॉन, गुगल यांसारख्या नामांकित ई-कॉमर्स कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे भासवून अमेरिका, कॅनडा आणि इतर देशांतील नागरिकांना संपर्क साधत होते. 

पार्सलमध्ये अमली पदार्थ आढळल्याची भीती दाखवून खंडणी मागणे तसेच बँक आणि क्रेडिट कार्डची माहिती मिळवून आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. फसवणुकीची रक्कम हवाला आणि क्रिप्टोकरन्सीद्वारे भारतीय चलनात आणली जात असल्याचाही संशय आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश विधाते करीत आहेत.

लोणावळ्यात फुगे विक्रेत्यांचा एकमेकांवर चाकू हल्ला 

लोणावळ्यात दोन फुगे विक्रेत्यांमध्ये चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. झोपलेल्या एका व्यक्तीवर दुसऱ्याने अचानक हल्ला केला. त्यानंतर दोघांमध्ये धारदार हत्याराने मारामारी झाली. या घटनेत दोघेही जखमी झाले असून, संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, या प्रकरणी लोणावळा पोलीस ठाण्यात अद्याप तक्रार दाखल झालेली नाही.

लोणावळ्यात भीषण अपघात

लोणावळ्याजवळील राजमाची गावाकडे जाणाऱ्या मार्गावर कुने गावच्या हद्दीत पाण्याच्या टँकरखाली आल्याने 19 वर्षीय रुपेश वाघमारे या युवकाचा चिरडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. रुपेश हा आदिवासी ठाकर समाजातील युवक होता. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.दरम्यान, अपघाताचा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या घटनेची चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणी पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करत आहेत.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES