SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

महाबळेश्वरच्या जगप्रसिद्ध स्ट्रॉबेरी पिकावर अल निनोचा भयानक परिणाम; थेट महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेलाच फटका बसणार

महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. अल निनोचा स्ट्रॉबेरी पिकाला मोठा फटका बसला आहे. स्ट्रॉबेरी लागवडीत 40 ते 50 टक्क्यांपर्यंत घट होण्याची भीती आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Oct 26, 2026, 04:26 PM IST | Updated: Oct 26, 2026, 04:34 PM IST
Join

सातारा महाबळेश्वर : जगप्रसिद्ध स्ट्रॉबेरीसाठी ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरवर यंदा हवामान बदलाचं मोठं संकट ओढवलं आहे. पावसाने दडी मारल्याने तसेच वाढतं तापमान आणि अल निनोचा संभाव्य प्रभाव यामुळे स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. यंदा स्ट्रॉबेरीच्या उत्पन्नात लक्षणीय घट होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. 

पाण्याच्या अभावामुळे लागवडीवर परिणाम होत असून, भविष्यातील धोका लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी यंदा स्ट्रॉबेरीच्या लागवडीत 40 ते 50 टक्क्यांपर्यंत घट केल्याचं सांगितलं जातंय. याचा फटका केवळ शेतकऱ्यांनाच नाही, तर महाबळेश्वरच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेलाही बसण्याची भीती व्यक्त होत आहे. 

महाबळेश्वर म्हटलं की डोळ्यांसमोर येते ती लालबुंद स्ट्रॉबेरीची शेती. मात्र, यंदा याच स्ट्रॉबेरीच्या पिकावर संकटाचं सावट आहे. ऑगस्ट महिन्यापासून वाढलेलं तापमान आणि त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने स्ट्रॉबेरी लागवडीसाठी आवश्यक असलेला ओलावा मिळणं कठीण झाले आहे. पाण्याची टंचाई आणि प्रतिकूल हवामानामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

स्ट्रॉबेरी हे महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचं प्रमुख साधन आहे. या पिकावर स्थानिक शेतकऱ्यांसह मजूर, रोपवाटिका, वाहतूक आणि पर्यटनाशी संबंधित अनेक व्यवसाय अवलंबून आहेत. मात्र, यंदा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी लागवड कमी करण्याचा निर्णय घेतल्याचं चित्र आहे. लागवडीत 40 ते 50 टक्क्यांपर्यंत घट झाल्यास त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो अशी भिती  स्ट्रॉबेरी उत्पादक नितीन भिलारे आणि किसनशेठ भिलारे यांनी व्यक्त केली आहे. 

स्ट्रॉबेरी पीक धोक्यात 

अल निनो आणि पावसाच्या अनियमिततेमुळे स्ट्रॉबेरी पिकावर परिणाम झाला आहे. ऑगस्टपासून वाढलेलं तापमान आणि पाण्याची टंचाई यामुळे  यंदा लागवडीत 40 ते 50 टक्क्यांपर्यंत घट केल्याने प्रचंड आर्थिक नुकसान होऊ शकते. स्ट्रॉबेरीवर अवलंबून असलेल्या महाबळेश्वरच्या अर्थव्यवस्थेसमोर संकट निर्माण झाले आहे.  वृक्षारोपण, झाडांचं संगोपन आणि वृक्षतोड रोखण्याची गरज असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. 

महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी हजारो लोकांच्या उपजीविकेचा आधार

महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी ही केवळ एक शेतीमालाची ओळख नाही, तर इथल्या हजारो लोकांच्या उपजीविकेचा आधार आहे. त्यामुळे हवामानातील बदल, पाण्याची उपलब्धता आणि पर्यावरण संवर्धन या मुद्द्यांकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे. अन्यथा, स्ट्रॉबेरीच्या लाल रंगामागे असलेली शेतकऱ्यांच्या कष्टांची कहाणी यंदा आर्थिक संकटाच्या छायेत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
हवामानातील बदलांचं हे संकट भविष्यात आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे केवळ तात्पुरत्या उपाययोजना करून चालणार नाही, तर पर्यावरण संवर्धनावरही भर देण्याची गरज आहे. मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणं, लावलेल्या झाडांचं संगोपन करणं आणि वृक्षतोड थांबवणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं जातंय. तरुणाई आणि शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेतल्यास भविष्यात अशा संकटांचा सामना करण्यासाठी मदत होऊ शकते.

 

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES