SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'हे आमचं अपयश, आम्ही कमी पडलो,' पुण्यातील जागा गेल्यानंतर सुनील तटकरेंची जाहीर कबुली, म्हणाले 'दादांच्या हयातीत...'

पुणे पदवीधर मतदारसंघावरून खासदार सुनील तटकरेंनी नाराजी व्यक्त केलीय. पुण्यातील जागा आमची होती. ही जागा मिळवण्यासाठी कमी पडलो अशी कबुली त्यांनी दिली आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Oct 06, 2026, 07:40 PM IST | Updated: Oct 06, 2026, 07:47 PM IST
Join

पुणे पदवीधर मतदारसंघावरून खासदार सुनील तटकरेंनी नाराजी व्यक्त केलीय. पुण्यातील जागा आमची होती. ही जागा मिळवण्यासाठी कमी पडलो. हे आमचं सामूहिक अपयश आहे, अशी प्रतिक्रिया तटकरेंनी दिलीय. मैत्रीपूर्ण लढण्यापेक्षा महायुती म्हणून निवडूक लढली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे. आगामी काळात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ असंही त्यांनी म्हटलं आहे.  

पुण्याची जागा आम्हाला मिळवता आली नाही हे आमचे सामुहिक अपयश आहे. दादाxच्या हयातीत ही जागा आणि त्यासाठी आवश्यक मतदान आमच्याकडे होते. लाड जरी तिकडे गेले तरी त्यांना झालेले मतदान आमचे होते. आम्ही जागा मिळवण्यात कमी पडलो. आगामी काळात अशा बाबी घडू नये यासाठी सुनेत्रा वहिंनींच्या नेतृत्वात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची भेट घेऊ असं सुनील तटकरे यांनी सांगितलं आहे.

भाजप विरुद्ध शिवसेना सामना रंगण्याची शक्यता

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना सामना रंगण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात भाजपनं कौस्तुभ गावडेंना उमेदवारी दिलीय. तर शिवसेनेच्या मंगेश चिवटे आणि उदय सामंत यांचं स्वीय सहायक सचिन सानप यांनीही उमेदवारी अर्ज भरलाय. यावर आता मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आलीय. पुणे शिक्षक मतदारसंघात एकमत झालं नाही, मात्र पुन्हा एकदा चर्चा होईल असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

अंतर्गत मतभेद आता चव्हाट्यावर

विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद आता चव्हाट्यावर आलेत. शिवसेनेने शिक्षक मतदारसंघातून मंगेश चिवटे यांना उमेदवारी जाहीर केलीय. चिवटेंनी आज उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीतील बेबनावाला आता अधिकृत स्वरूप आलंय. दरम्यान शिक्षक मतदारसंघाच्या  निवडणुकीत भाजपच्या गेल्या निवडणुकीतील नाशिक पॅटर्नला प्रत्युत्तर देण्याची खेळी शिवसेनेकडून पुण्यात खेळली जाते का? याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झालीय.

मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीला स्वतः एकनाथ शिंदे यांनी दुजोरा दिलाय. चिवटे यांना AB फॉर्म दिल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र या सगळ्या घडामोडींवरून महायुतीतील अंतर्गत मतभेद आता लपून राहिलेले नाहीत. शिंदे यांची दिल्लीवारीही या पार्श्वभूमीवर चर्चेत आलीय. चिवटे यांच्या उमेदवारीचं भवितव्य शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर स्पष्ट होईल, अशी चर्चा आहे. अर्ज माघारीपर्यंत चर्चेची शक्यता असल्याचं शिंदे यांनीही म्हटलंय. पुणे शिक्षक मतदारसंघात एकमत झालं नाही..  मात्र पुन्हा एकदा चर्चा होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय.

पण महायुतीच्या या राजकारणात आता दुसराही ट्विस्ट आलाय. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन सानप यांनी बंडखोरी केलीय. सानप यांनी आधीच आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. म्हणजेच भाजपचे कौस्तुभ गावडे, शिवसेनेचे मंगेश चिवटे, आणि शिवसेनेचेच बंडखोर डॉ. सचिन सानप अशी तिरंगी समीकरणं तयार झालीयत.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES