SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

IT इंजिनीयर, पुण्यातील झांबरे पॅलेच्या मालकाची सून, पायलचा मृत्यू, पती अक्षय झांबरेला अटक

पुण्यात पायल झांबरे नावाच्या विवाहीतेचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 02, 2026, 11:16 PM IST | Updated: Nov 02, 2026, 11:21 PM IST
Join

पुणे क्राईम : पुण्यात एका 29 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. पायल झांबरे असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. पायल झांबरे नामांकित झांबरे पॅलेच्या मालकाची सून असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी झांबरे पॅलेस मंगल कार्यालयाची तोडफोड केली. कौंटुबिक वादातून आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. पती अक्षय झांबरेला अटक करण्याकत आली आहे.

मुकुंदनगर परिसरातील अक्षय हाइट्स सोसायटीमधील जुन्या फ्लॅटमध्ये पायल अक्षय झांबरे (वय ३०) या सॉफ्टवेअर अभियंता विवाहितेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पायल यांच्या मृत्यूनंतर माहेरच्या नातेवाइकांनी सासरच्या मंडळींवर हुंडा आणि सोन्याच्या मागणीसाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या घटनेनंतर संतप्त नातेवाइकांनी झांबरे पॅलेस येथे तोडफोड केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे.

पायल या एका नामांकित माहिती-तंत्रज्ञान कंपनीत सॉफ्टवेअर अभियंता म्हणून कार्यरत होत्या. त्यांचा अक्षय झांबरे यांच्याशी सुमारे पाच वर्षांपूर्वी विवाह झाला होता. या दाम्पत्याला एक मुलगी आहे.
सोमवारी (२ नोव्हेंबर) मुकुंदनगर येथील अक्षय हाइट्स सोसायटीतील जुन्या फ्लॅटमध्ये पायल यांचा मृतदेह छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. 

पायल रविवार रात्रीपासून दिसत नसल्याची माहिती नातेवाइकांना मिळाली होती. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला.

पायल यांचे चुलत भाऊ जनार्दन पवार यांनी केलेल्या आरोपांनुसार, दर दिवाळीत पाच ते दहा तोळे सोन्याची मागणी केली जात होती. यंदा ही मागणी पूर्ण करणे शक्य नसल्याने माहेरच्या मंडळींनी पुढील वर्षापर्यंत थांबण्याची विनंती केली होती. मात्र, त्यानंतरही पायल यांचा छळ सुरू असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.

दरम्यान, या आरोपांमुळे आणि नातेवाइकांच्या संतापामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.  या प्रकरणात मृत्यूचे नेमके कारण, छळाच्या आरोपांची सत्यता आणि तोडफोडीच्या घटनेबाबत पोलिस तपासातून पुढील माहिती स्पष्ट होणे अपेक्षित आहे.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES