SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

पुण्याच्या तळेगाव MIDC मध्ये 11,000 कोटींची महागुंतवणूक; एकाचवेळी 18,000 लोकांना नोकरी मिळणार

तळेगावात ह्युंदाई नवा प्लांट उभारणार आहे. ह्युंदाईने 11 हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. 18 हजार रोजगारांची संधी उपलब्ध होणार आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Oct 14, 2026, 08:21 PM IST | Updated: Oct 14, 2026, 08:26 PM IST
Join

पुणे तळेगाव MIDC : पुण्याच्या    तळेगाव MIDC मध्ये 11,000 कोटींचा नवा प्रकल्प सुरु होणार आहे. ह्युंदाई कंपनी तळेगाव MIDC मध्ये नवा प्लांट उभारणार आहे. कंपनीने 11 हजार कोटींची गुंतणूक केली आहे. या नव्या प्रकल्पामुळे 18,000 रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.  

मावळच्या तळेगाव एमआयडीसीमध्ये ह्युंदाईच्या नव्या उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आले. या प्रकल्पासाठी 11 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. सुमारे 18 हजार रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत. या प्लांटमध्ये दरवर्षी 3 लाख 20 हजार मोटारींचं उत्पादन करण्याचं उद्दिष्ट आहे. 

जनरल मोटर्सकडून प्रकल्प हस्तांतरित करताना अनेक अडचणी आल्या. मात्र, आता हा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं उभा राहत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. या प्रकल्पामुळे मावळच्या औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासोबतच स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

तळेगावातील ईव्ही प्रकल्पामुळे उद्योगाला चालना मिळणार

तळेगावातील EIM (ENERGY IN MOTION) च्या इलेक्ट्रिक ट्रक आणि बॅटरी उत्पादन प्रकल्पामुळे राज्यातील ईव्ही उद्योगाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. MOU मधूनच Energy in Motion सारखे प्रकल्प साकार होतात, असं सांगत त्यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर दिलं. इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषण आणि इंधनावरील परकीय चलनाचा खर्च कमी होईल. तसंच, चार मिनिटांत बॅटरी बदलण्याचं तंत्रज्ञान आणि चार्जिंग स्टेशनच्या विस्तारासाठी राज्य सरकार सहकार्य करेल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली. यावेळी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार एकाच मंचावर उपस्थित होते.

 

Add Zee News as a Preferred Source

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES