SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

अंबरनाथमध्ये नवजात बाळाच्या विक्रीचा प्रयत्न; बाळाचं अपहरण केल्याप्रकरणी 5 जणांना अटक

अंबरनाथमध्ये नवजात बाळाच्या विक्रीचा प्रयत्न झाला आहे.  बाळाचं अपहरण केल्याप्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. बाळ चोरी प्रकरणाचं गुजरात कनेक्शन समोर आले आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Oct 12, 2026, 11:18 PM IST | Updated: Oct 12, 2026, 11:22 PM IST
Join

अंबरनाथ क्राईम :  अंबरनाथमध्ये एका नवजात बाळाच्या विक्रीचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.  बाळाची सुखरूप सुटका करण्यात आलीय. या बाळाची गुजरातमध्ये विक्री केली जाणार होती, असंही पोलीस तपासात समोर आलंय. बाळ चोरीच्या या प्रकरणामुळे अंबरनाथमध्ये खळबळ उडालीय. आता बाळचोरीच्या या प्रकरणामागे मोठी टोळी आहे का? याचा आता पोलीस शोध घेत आहेत. 

अंबरनाथमध्ये एका नवजात बाळाच्या विक्रीचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे बाळ अवघं 25 दिवसांचं असून आईच्या इच्छेविरूद्ध या बाळाला तिच्यापासून दूर नेऊन त्याची विक्री करण्याचा प्रयत्न झाल्याचं समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली असून बाळाची सुखरूप सुटका केलीय. या बाळाची गुजरातमध्ये विक्री केली जाणार होती असंही पोलीस तपासात समोर आले. 

10 ऑक्टोबरला बाळ चोरीचा हा प्रकार घडलाय. आपल्या 25 दिवसांच्या बाळाला आईपासून दूर नेऊन नातेवाईकांमार्फत त्याची विक्री करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची तक्रार बाळाचे वडील संतोष वाघे यांनी 11 ऑक्टोबरला पोलिसांत दिली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तपासादरम्यान, एका मूकबधिर महिलेनं हे बाळ पळवून ते सोनी गणेश नावाच्या महिलेकडे दिल्याची माहिती समोर आली. 

अंबरनाथमधील स्वामी नगर परिसरात सोनी गणेश हिच्याकडे ते बाळ देण्यात आल्याचं समजलं. या प्रकरणात पार्वती नावाची संबंधित महिला,  तिचा काका भक्तिवेल आणि सोनी गणेश यांना पोलिसांनी अटक केलीय. दरम्यान, हे बाळ रुक्सार नावाच्या महिलेकडेही देण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मोबाईलच्या आधारे तपास करत रुक्सारचा शोध घेतला. तिला ताब्यात घेऊन तिच्याकडून बाळाचा ताबा घेत पोलिसांनी त्याची सुखरूप सुटका केली.  बाळ चोरीच्या या प्रकरणामुळे अंबरनाथमध्ये खळबळ उडालीय. आता बाळचोरीच्या या प्रकरणामागे मोठी टोळी आहे का? याचा आता पोलीस शोध घेत आहेत. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES