SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

धक्कादायक! पार्टीत 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार; 'माझा नंबर कधी येणार?', म्हणत आरोपी करत होते जल्लोष

युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोने 21 वर्षीय तरुणीने पार्टीदरम्यान तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार नोंदवल्याची माहिती दिली आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Oct 16, 2026, 02:07 PM IST | Updated: Oct 16, 2026, 02:12 PM IST
Image Credit: 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार
Join

अमेरिकेतील आणखी एका प्रतिष्ठित विद्यापीठात तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका फ्रॅटर्निटी हाऊसमध्ये लैंगिक हिंसाचाराचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित तरुणीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, शिकागो विद्यापीठाच्या (UChicago) फ्रॅटर्निटी हाऊसच्या बाथरूममध्ये तिच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप केला आहे. तसंच यावेळी काही तरुण बाहेर उभे राहून "माझी पाळी कधी?" आणि "मला आत येऊ द्या" असे ओरडत होते असेही तिने सांगितले आहे.

अमेरिकेतील प्रतिष्ठीत आणि सर्वोच्च मानांकित संशोधन संस्था असलेल्या शिकागो विद्यापीठाने या घटनेसंदर्भात माहिती दिली आहे. या विद्यापीठात एकूण 18 हजार विद्यार्थी आहेत. रविवारी पहाटे अल्फा एप्सिलॉन पाय (Alpha Epsilon Pi) फ्रॅटर्निटी हाऊसमध्ये पार्टीदरम्यान 21 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. विद्यापीठाने पीडित तरुणी विद्यार्थिनी नसल्याचं म्हटलं आहे. तसंच, एका दुसऱ्या व्यक्तीने आरोपीला हटकल्यानंतर तो घरातून पळून गेला, असेही विद्यापीठाने सांगितले.

शिकागो पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत कोणालाही आरोपी करण्यात आले नसल्याचे सांगितले आहे. मात्र विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी एक सूचना जारी करून कळवले आहे की, या प्रकरणाशी संबंधित एका व्यक्तीची ओळख पटली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित तरुणीने या घटनेसंदर्भात पोलिसांकडे तक्रार नोंदवली आणि उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाली.

नेमके आरोप काय आहेत?

फ्रॅटच्या इंस्टाग्रामला पार्टीची जाहिरात पाहिल्यानंतर मी माझी मैत्रीण लारा आणि आणि आणखी एका मैत्रिणीसोबत तिथे गेले होते असं पीडित तरुणीने सांगितले असल्याचे वृत्त The New York Post ने दिले आहे.

'शिकागो सन-टाइम्स'ने पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीने पार्टीमध्ये मद्यपान केले आणि नाचत होती. यानंतर काही वेळातच तिला अस्वस्थ वाटू लागले होते. नंतर तिच्या दोन मैत्रिणींना ती एका बाथरूममध्ये एका तरुणासोबत आढळली. यावेळी तिला अजिबात शुद्ध नव्हती. तसंच त्यांच्या अंगावरील कपडेही बऱ्यापैकी काढलेले होते.

'सन-टाइम्स'च्या वृत्तानुसार, त्या मैत्रिणींनी पोलिसांना सांगितले की, बाथरूममध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांना तिथे उपस्थित असलेल्या काही तरुणांना बाजूला सारून बळजबरीने आत जावे लागले. हे पुरुष तिथे आनंद व्यक्त करत होते आणि जणू काही आत सुरू असलेल्या प्रकाराला प्रोत्साहन देत होते.

'न्यूयॉर्क पोस्ट'शी बोलताना लाराने सांगितले की, मैत्रिणीचा शोध घेत असताना तिला तळघरातील एका बंद बाथरूमच्या दाराबाहेर काही तरुणांची हालचाल दिसली. हे तरुण जोरजोरात ओरडत होते. हे लोक माझी पाळी कधी येणार? आणि "मला आत जायचे आहे," अशी विधाने करत होते.

तिने सांगितले की, तिने कसेबसे बाथरूमचे दार उघडले. आतमध्ये तरुणी भिंतीला टेकून बसलेली होती; तिचे कपडे काढलेले होते आणि अंतर्वस्त्रे खाली ओढलेली होती. पीडित तरुणी "हे थांबवा" आणि "मला इथून बाहेर काढा" असे ओरडत होती.

लाराने दावा केला की, तिने त्या तरुणांचा 'फ्रॅट हाऊस'च्या (विद्यार्थी संघटनेच्या निवासस्थाना) बाहेर पाठलाग केला आणि त्यांच्यावर आपल्या मैत्रिणीवर अत्याचार केल्याचा आरोप केला. त्यावर त्यांनी कथितरीत्या "तिलाच हे हवे होते." असे उत्तर दिले.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES