नवऱ्यानेच तिला अंगणात सर्वांसमोर परपुरुषासोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडलं अन् नंतर...; गुजरातमधील हादरवणारी घटना
पोलिसांच्या पथकांनी परिसरातील घरांची झडती घेतली आणि एका घरात ती महिला सापडली. पोलिसांना पाहताच ती रडू लागली. तिला पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर तिने जे काही सांगितलं ते फारच धक्कादायक होतं.
माणुसकीला काळीमा फासणारी घटना गुजरातमधील सुरेंद्रनगरमधून समोर आली आहे. येथील एका महिलेच्या पतीसहीत त्याच्या नातेवाईकांना पोलिसांनी अटक केली आहे. अटकेत असलेल्या 9 आरोपींना महिलेच्या जोडीदाराला तिच्यासोबत लैंगिक कृत्य करायला लावल्याचा आणि शुद्धीकरण विधी म्हणून लघवी पिण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे.
आरोपींनी नेमकं केलं काय?
पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी 4 ऑक्टोबर रोजी पीडित जोडप्याला सुरेंद्रनगरला आणले. त्यानंतर त्यांनी हा विधी करणार असल्याचे सांगितले. त्यांनी दोघांना लाकडी काठ्यांनी मारहाण केली, पुरुषाला दोरीने झाडाला बांधले आणि महिलेला एका खोलीत डांबून ठेवले, असे 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. त्यानंतर, त्या पुरुषाला अंगणात महिलेसोबत लैंगिक कृत्य करण्यास (शरीरसंबंध ठेवण्यास) भाग पाडण्यात आले. यावेळेस दोघांचाही अपमान करण्यात आला. तसेच, त्याला तिची लघवी पिण्यासही भाग पाडण्यात आले, असेही वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.
व्हिडीओ कोणी व्हायरल केले?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना आरोपींनी मोबाईल फोनवर रेकॉर्ड केली. त्यानंतर हे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आले. 'ए-डिव्हिजन' पोलीस ठाण्याचे निरीक्षक आर. एम. सांगडा यांनी यासंदर्भात माहिती देताना, हे व्हिडीओ कोणी रेकॉर्ड केले आणि ते ऑनलाइन कोणी शेअर केले, याचा शोध पोलीस घेत असल्याचं सांगितलं.
नवऱ्याला सोडून जोडीदारासोबत
मिळालेल्या माहितीनुसार, सदर पीडित महिलेचे लग्न वापी येथील एका व्यक्तीशी झाले होते. परंतु तिने त्याला सोडून चोटीला येथे आश्रय घेतला होता. तिथे ती तिच्या जोडीदारासोबत सुमारे तीन महिन्यांपासून राहत होती. बरेच दिवस ती घरी न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. त्यांनी तिला परत वापीला नेले आणि एका घरात डांबून ठेवले. अखेरीस ती तिथून निसटली आणि पुन्हा चोटीलाला परतली.
ती पुन्हा पळून गेल्याचं समजल्यानंतर पतीने...
जेव्हा तिच्या पतीला समजले की ती पुन्हा तिच्या जोडीदारासोबत राहत आहे, तेव्हा त्याने आपल्या नातेवाईकांना याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी त्या जोडप्याचा शोध घेतला आणि त्यांना सुरेंद्रनगरला नेले. सुरेंद्रनगरचे डीएसपी प्रेमसुख डेलू यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना, या समाजातील एका नेत्याने सदर महिलेवर झालेल्या अमानुष अत्याचाराबाबत फोन करुन कळवल्यानंतर आणि या साऱ्या घटनेचे व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पीडित महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांची अनेक पथके तैनात करण्यात आली होती, असंही त्यांनी सांगितलं.
पोलिसांना पाहताच रडू लागली
पोलिसांच्या पथकांनी परिसरातील घरांची झडती घेतली आणि एका घरात ती महिला सापडली. डेलू यांनी सांगितले की, पोलिसांना पाहताच ती रडू लागली. अधिकाऱ्यांनी व्हिडिओमधील महिलेशी तिचा चेहरा पडताळून पाहिला आणि तिला पोलीस ठाण्यात आणले. तिथे समुपदेशनानंतर तिने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची आपबिती सांगितली.
कोणत्या कलमाखाली गुन्हा दाखल?
'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, आरोपींवर 'भारतीय न्याय संहिते'च्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये कलम 70(1) (फसवणुकीद्वारे लैंगिक संबंध), 115(2) (स्वेच्छेने दुखापत करणे), 127(3) (बेकायदेशीरपणे डांबून ठेवणे) यांचा समावेश आहे. तसेच आरोपींविरुद्ध 142 (अपहरित व्यक्तीला बेकायदेशीरपणे लपवून ठेवणे किंवा आपल्या ताब्यात ठेवणे) आणि 3(5) (सामायिक उद्देश साध्य करण्यासाठी अनेक व्यक्तींनी केलेली कृती) यांचा समावेश आहे. तसेच, 'माहिती तंत्रज्ञान कायद्या'तील तरतुदीनुसार कलम लावण्यात आले आहेत.