2 तासांत 2500 घरांचे रेकॉर्डब्रेक बुकिंग; DDA ची 2,516 घरांची जबरदस्त योजना; फ्लॅटची किंमत 14.95 लाख
DDA ने 2,516 घरांची जबरदस्त योजना आणली आहे. 2 तासांत 2500 घरांचे रेकॉर्डब्रेक बुकिंग झाले आहे.
DDA Housing Investment Scheme 2026 : दिल्लीत स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी, दिल्ली विकास प्राधिकरणाची (DDA) गृहनिर्माण योजना आणली आहे. डीडीएच्या गृहनिर्माण गुंतवणूक योजना 2026 ला पहिल्याच दिवशी प्रचंड प्रतिसाद मिळाला. मंगळवारी दुपारी 12 वाजता ऑनलाइन बुकिंग सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन तासांतच 2500 हून अधिक एलआयजी फ्लॅट्स बुक झाले. या योजने अंतर्गत नरेला येथे 14.95 लाख रुपयांपासून सुरू होणारे परवडणारे फ्लॅट्स उपलब्ध आहेत.
या योजनेअंतर्गत नरेला येथील पॉकेट 3 आणि पॉकेट 6 मध्ये एकूण 2,516 फ्लॅट्स विक्रीसाठी उपलब्धआहेत. 25 टक्के सवलतीच्या दरात हे फ्लॅट विक्रीसाठी असल्याची माहिती डीडीएने दिली. या फ्लॅटची सुरुवातीची किंमत 14.59 लाख आहे. पॉकेट 3 मध्ये 1,020 फ्लॅट्स आणि पॉकेट 6 मध्ये 1,496 फ्लॅट्स आहेत.
'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर हे फ्लॅट बुकिंग केले जात आहेत. या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. दिल्लीतील परवडणाऱ्या घरांची मागणी वाढत आहे. घर खरेदीसाठी प्राधिकरणाच्या गृहनिर्माण योजनांना लोक प्रसिसाद देत असल्याचे दिसत आहे. नायब राज्यपाल (LG) आणि डीडीएचे अध्यक्ष टी. एस. संधू यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना सुरू करण्यात आली आहे. परवडणारी घरे उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
ऑनलाइन बुकिंग
या DDA योजनेअंतर्गत, इच्छुक खरेदीदार ऑनलाइन बुकिंग करून आपल्या पसंतीचा फ्लॅट निवडू शकतात. 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या योजनेअंतर्गत उपलब्धतेनुसार फ्लॅट्सचे वाटप केले जाणार आहे. या योजनेअंतर्गत देण्यात येणारी 25 टक्के सवलत, कमी बजेटमध्ये घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांना दिलासा देईल अशी अपेक्षा आहे. तथापि, फ्लॅटची उपलब्धता बुकिंगच्या स्थितीवर अवलंबून असेल.
कमी किंमतीत घर खरेदी करण्याची संधी
डीडीएच्या गृहनिर्माण गुंतवणूक योजने अंतर्गत कमी किंमतीत घर खरेदी करण्याची संधी आहे. मर्यादित बजेट असलेल्यांना दिलासा देणारी ही योजना आहे. नरेला येथील या एलआयजी फ्लॅट्सवरील सवलतीच्या किमती खरेदीदारांना कमी किमतीत घरे खरेदी करण्याची संधी देतात. पहिल्याच दिवशी केवळ दोन तासांत 2500 हून अधिक फ्लॅट्सचे बुकिंग झाले आहे.