SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'मोदींच्या 'त्या' परदेश दौऱ्यांची माहिती उघड केल्यास राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होईल', कोर्टाचा शेरा; याचिका फेटाळली

विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासंदर्भातील ही माहिती देण्याचे निर्देश केंद्रीय माहिती आयोगाने दिले होते. मात्र हा निर्णय दिल्ली उच्च न्यायलायने रद्द केला आहे. नेमकं हे प्रकरण काय जाणून घ्या...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Oct 20, 2026, 08:23 AM IST | Updated: Oct 20, 2026, 08:36 AM IST
Image Credit: मोदी आणि मनमोहन सिंग यांच्यासंदर्भात मागितलेली माहिती (प्रातिनिधिक फोटो)
Join

दिल्ली हायकोर्टाने पंतप्रधान परदेश दौऱ्यांसंदर्भातील माहिती देण्याचा निर्णय स्थगित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भारतीय हवाई दलाच्या विमानातून केलेल्या परदेश दौऱ्यांची माहिती देण्यास दिल्ली हायकोर्टाने नकार दिला आहे. दोन्ही पंतप्रधानांनी भारतीय हवाई दलाच्या विमानांमधून केलेल्या परदेश दौऱ्यांची सविस्तर माहिती उघड करण्याचा केंद्रीय माहिती आयोगाचा (CIC) आदेश दिल्ली हायकोर्टाने रद्द केला. यासाठी सुरक्षेचं कारण देण्यात आलं आहे.

नेमकी कोणी आणि कोणती माहिती मागवली?

न्यायमूर्ती अमित महाजन यांनी 15 ऑक्टोबर रोजी दिलेल्या आदेशात ही माहिती उघड केल्यास राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असे निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. निवृत्त कमोडोर लोकेश बत्रा यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत (RTI) ही माहिती मागितली होती. त्यांनी एप्रिल 2013 ते जून 2018 या कालावधीत भारतीय हवाई दलाच्या विमानातून पंतप्रधानांनी केलेल्या  परदेश दौऱ्यांचा तपशील मागितला होता. यामध्ये विमानांची माहिती, हवाई दलातील कर्मचारी, स्पेशल फ्लाइट रिटर्न्स (SFR) भाग एक आणि दोन, पंतप्रधानांसोबत प्रवास करणाऱ्या संपूर्ण ताफ्याचा तपशील आणि विशेष संरक्षण गटाच्या (SPG) कर्मचाऱ्यांची नावं यासारखी माहिती मागवण्यात आली होती. 

माहिती उघड केल्यास पंतप्रधानांच्या सुरक्षेला धोका

ही माहिती सार्वजनिक केल्यास राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येऊ शकते. तसेच पंतप्रधानांच्या जीवाला आणि शारीरिक सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे न्यायालयाने निर्णय देताना स्पष्ट केलं आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी तैनात यंत्रणांवर होणाऱ्या संभाव्य परिणामांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असेही न्यायालयाने आपला निकाल सुनावताना नमूद केले आहे.

पुनर्विचार करू शकत नाही

सुरक्षा यंत्रणांच्या निर्णयात हस्तक्षेप करता येणार नाही असंही न्यायालयाने स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं आहे. एखादी माहिती उघड केल्याने राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होईल किंवा पंतप्रधानांच्या जीविताला धोका पोहोचेल की नाही, याबाबत सक्षम सुरक्षा यंत्रणांनी घेतलेल्या निर्णयावर हायकोर्ट किंवा केंद्रीय माहिती आयोग अपील न्यायालयाप्रमाणे पुनर्विचार करू शकत नाही, असे न्यायमूर्ती महाजन यांनी स्पष्ट केले.

काय आहे प्रकरण?

निवृत्त कमोडोर लोकेश के. बत्रा यांनी जून 2018 मध्ये माहिती अधिकारांतर्गत अर्ज दाखल केला होता. एप्रिल 2013 ते जून 2018 या कालावधीत भारतीय हवाई दलाच्या विमानातून भारतीय पंतप्रधानांनी केलेल्या परदेश दौऱ्यांची माहिती त्यांनी मागितली होती. या प्रकरणात केंद्रीय माहिती आयोगाने माहिती उघड करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, दिल्ली हायकोर्टाने हा आदेश रद्द केला आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES