SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

40 व्हिला विकत घेतले, एका वर्षात 1.8 कोटी कमावले; भारतातील IAS-IPS नवरा बायकोची चौकशी करताना ACB चे अधिकारी चक्रावले

भारतातील IAS-IPS नवरा बायकोने 40 व्हिला विकत घेतले. यातून त्यांनी वर्षाला 1.8 कोटी कमावले आहेत. या दोघांची चौकशी करताना ACB चे अधिकारी चक्रावले आहेत.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 02, 2026, 10:41 PM IST | Updated: Nov 02, 2026, 10:50 PM IST
Join

IAS Shikhar Agarwal And IPS Prashakha Mathur : IAS, IPS ही भारतातील सर्वोच्च नागरी सेवा पद आहेत. या पदावर काम करणाऱ्या अधिऱ्यांना सर्व सोई सुविधा मिळतात. IAS-IPS दर्जाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याची अनेक प्रकरण समोर येतात.  भारतातील IAS-IPS नवरा बायकोची चौकशी करताना ACB चे अधिकारी चक्रावले आहेत. या दोघा IAS-IPS नवरा बायकोने 40 व्हिला खरेदी केले. या मालमत्तेच्या माध्यमातून या IAS-IPS नवरा बायकोने एका वर्षात 1.8 कोटी रुपये कमावले आहेत. राजस्थानमधील हे प्रकरण आहे. 

आयएएस अधिकारी शिखर अग्रवाल आणि त्यांच्या पत्नी वरिष्ठ आयपीएस अधिकारी प्रशाखा माथूर असे या दाम्पत्याचे नाव आहे. शिखर अग्रवाल आणि प्रशाखा माथूर  यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत मोठा भ्रष्टाचार केला आहे. एसीबी मार्फत यांची चौकशी सुरु आहे. 30 ऑक्टोबर रोजी एसीबीने निवेदन जारी करत या प्रकरणाची माहिती दिली. ॉ

प्राथमिक तपासात असे पुरावे आढळले आहेत, ज्यावरून प्रथमदर्शनी असे दिसून येते की, शिखर अग्रवाल यांनी गोयल फॅशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांच्या संगनमताने, 'अनंता' ब्रँडखाली रिसॉर्ट्स चालवणाऱ्या कंपनीला अवाजवी लाभ मिळवून दिला आहे असे निदेनात म्हंटले आहे.

शिखर अग्रवाल यांनी विविध सरकारी पदांवर कार्यरत असताना, कंपनीला रिसॉर्टच्या बांधकामाच्या अटींमध्ये सवलती दिल्या. आवश्यक प्रमाणपत्रांची योग्य पडताळणी न करताच मंजुऱ्या दिल्या. अनुकूल अटींवर विशेष आर्थिक पॅकेजेसचा देखील लाभ मिळवून दिला. या निर्णयामुळे राज्य सरकारला आर्थिक नुकसान झाले असा एसीबीचा दावा आहे. राज्य सरकारने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 17अ अंतर्गत सविस्तर चौकशीला मंजुरी दिली आहे.

एसीबीच्या तपासात धक्कादायक माहिती उघड

एसीबीच्या तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी सप्टेंबर 2023 ते मार्च 2026 दरम्यान उदयपूरमधील बुझडा आणि अलवरमधील अजबगड येथील दोन अनंता रिसॉर्ट्समध्ये 40 मालमत्ता खरेदी केल्या. त्यांचे एकूण मूल्य अंदाजे 6.16 कोटी रुपये आहे.

सप्टेंबर 2023 मध्ये उदयपूर रिसॉर्टमध्ये 20 कॉटेज, तर मार्च 2026 मध्ये अलवर रिसॉर्टमध्ये 20 व्हिला खरेदी करण्यात आले. या मालमत्ता अग्रवाल आणि त्यांच्या पत्नीच्या, तसेच त्यांच्या दोन मुलांच्या तसेच प्रशाखा माथूर यांच्या आई-वडिलांच्या नावावर नोंदणीकृत करण्यात आल्या आहेत.

उदयपूरमध्ये अग्रवाल आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर प्रत्येकी 10 व्हिला खरेदी करण्यात आले होते. अलवरमधील मालमत्तादेखील कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदवण्यात आल्या होत्या. काही व्हिला बाजारभावापेक्षा खूपच कमी किमतीत खरेदी करण्यात आले असाव्यात असा ACB ला संशय आहे.

शिखर अग्रवाल यांनी त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेश्रा जास्त मालमत्ता जमा केली आहे.  एसीबी आता  याचीही चौकशी करत आहे. यांच्या या भ्रष्टाचारात सहभराी असलेले इतर अधिकारी, कंपनी संचालक आणि इतर संबंधित व्यक्तींची देखील चौकशी केली जात आहेय  सध्या, या सर्व आरोपांची चौकशी सुरू असून, एजन्सीकडून सखोल तपास झाल्यानंतरच या प्रकरणाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल असे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES