एकाचवेळी 15 कंपन्यांकडून जॉब ऑफर, 2.9 लाख पगार घेणाऱ्याला थेट UAE मध्ये 1.5 कोटी पगाराची नोकरी कशी मिळाली?
2.9 लाख पगार असलेली नोकरी अचानक गमावली. यानंतर खचून न जाता नव्या संधी शोधत थेट UAE मध्ये 1.5 कोटी पगाराची नोकरी मिळाली आहे.
Layoff : सध्या जगभरात सर्वच कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात सुरु आहे. लाखो लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. यामुळे कधीगी नोकरीवर गदा येऊ शकते. या दहशतीत अनेक कर्मचारी आहेत. अशातच एका टेक प्रोफेशनलने आपली सक्सेस स्टोरी सोशल मिडीयावर शेअर केली आहे. 2.9 लाख पगार घेणाऱ्याला या टेक प्रोफेशनलला थेट UAE मध्ये 1.5 कोटी पगाराची नोकरी मिळाली आहे. त्याला एकाचवेळी 15 कंपन्यांकडून जॉब ऑफर आल्या होत्या. जाणून घेऊया त्याच्या करिअरमध्ये नेमकं काय घडलं?
शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रत्येक जण चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असतात. अनेकदा खूप मेहनत करूनही अपेक्षेप्रमाणे यश मिळत नाही यामुळे अनेकजण खचून जातात. एका टेक प्रोफेशनले आपली एक कहाणी सांगितली आहे, ज्यामुळे तरुणांना प्रोत्साहनच मिळेल. कठोर मेहनती शिवाय यश मिळत नाही असा सल्लाही त्याने दिला.
करिअरची सुरुवात केली तेव्हा माझा पगार फक्त 2.9 लाख होता. आता मला संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) 1.5 कोटी पगाराच्या जॉबची ऑफर आली आहे. मात्र, हा टप्पा गाठणे इतकं सहज सोप्प नव्हतं. प्रोफेशनल लाईफमध्ये नव्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागल्या.
रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याने संपूर्ण स्टोरी शेअर केली आहे. आपल्या करिअरची सुरुवात एल अँड टी इन्फोटेकमध्ये मॅन्युअल टेस्टिंग असिस्टंट म्हणून केली. कंपनीच्या आवश्यक अंतर्गत परीक्षांमध्ये उत्तीर्ण न झाल्यामुळे नोकरी गमवावी लागली. तेव्हा वार्षिक पगार फक्त 2.9 लाख रुपये होता. मात्र, मी हार मानली नाही. एका मित्राच्या सल्ल्यानुसार मी आयबीएममध्ये पुन्हा अर्ज केला. 15 दिवसांत त्याला नोकरी मिळाली. मात्र, तिथेही माला माझ्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी लगेच मिळाली नाही असे या टेक प्रोफेशनलने सांगितले.
आयबीएममध्ये मला जेडी एडवर्ड्सशी संबंधित काम देण्यात आले होते. पण मला बिग डेटामध्ये काम करायची आवड होती. यामुळे स्वतःहून हे काम शिकायला सुरुवात केली. पण अनुभव नसल्यामुळे हव्या असलेल्या प्रोजेक्टवर पद मिळवता आले नाही. मात्र, मी हार मानली नाही. खूप प्रयत्नांनंतर, मे 2020 मध्ये त्याला एका बिग डेटा प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळाली.
नवीन जबाबदाऱ्या शिकण्यासाठी आणि काम समजून घेण्यासाठी त्याला अनेकदा दिवसातून 14 ते 15 तास काम करावे लागत असे. असे असूनही, जानेवारी 2022 पर्यंत माझा वार्षिक पगार फक्त सुमारे 3.78 लाख रुपये होता. एवढी मेहनत करूनही पगारात लक्षणीय वाढ झाली नाही. यामुळे मी नवीन करिअर आणि जादा पगाराची नोकरी शोधण्यास सुरुवात केली. विविध कंपन्यांकडून नोकरीच्या संधी मिळाल्या आणि अखेरीस त्याचा पगार वाढला. एकामागून एक विविध कंपन्यांमध्ये नोकरी बदलत पगार वाढला असे त्याने सांगितले.
एअरबसमध्ये नोकरी मिळाली. येथे वर्षाला 23 लाखाचे पॅकेज मिळाले. यात 5 लाख रुपयांच्या जॉइनिंग बोनसचा समावेश होता. तिथे त्याने पॅलंटिर फाऊंड्रीसोबत काम केले. अनेक मोठ्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळाली. प्रोजेक्टमध्ये योगदान देऊनही त्याला अपेक्षित असलेली ओळख मिळाली नाही. कामाचे कौतुक झाले नाही अशी खंत त्याने व्यक्त केली.
यानंतर मी पुन्हा नव्या नोकरीचा शोध सुरु केला. 15 कंपन्यांकडून जॉब ऑफर्स मिळाल्या. थॉटवर्क्समध्ये वार्षिक 48 लाख रुपये पगार असलेली जॉब ऑफर स्विकारली. अवघ्या दोन महिन्यांनंतर, त्याला दुसऱ्या संस्थेकडून वार्षिक 62 लाख रुपये पगाराची आणि 500, 000 रुपयांच्या जॉइनिंग बोनसची ऑफर मिळाली. या कंपनीत वर्क फ्रॉम होम सुविधा होती.
युएईमध्ये 1.5 कोटी रुपयांच्या पगाराचा जॉब
जवळपास साडे नऊ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक चढ-उतार अनुभवल्यानंतर युएईमधील एका कन्सल्टिंग फर्ममध्ये नोकरी मिळाली आहे. येथे वर्षाला 1.5 कोटी पगाराचे पॅकेज मिळाले आहे. हा माझ्यासाठी आंतरराष्ट्रीय नोकरीचा पहिलाच अनुभव आहे. या नऊ वर्षात नव्या नोकऱ्या शोधताना खूप नवीन काही शिकायला मिळाले.