SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

भारताच्या IT सेक्टरमध्ये पुन्हा मोठा भूकंप! मायक्रोसॉफ्ट कंपनीची 60000 कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्याची ऑफर, मोबदला काय मिळणार?

मायक्रोसॉफ्ट कंपनीने 60000 कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्याची ऑफर दिली आहे. भारतासह अमेरिका, युनायटेड आणि कॅनडा देशात कर्मचारी कार्यरत आहेत.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Oct 27, 2026, 07:26 PM IST | Updated: Oct 27, 2026, 07:32 PM IST
Join

Microsoft Job Cuts: IT सेक्टरमध्ये पुन्हा एक मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीतील 60000 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यत आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीने 60000 कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्याची ऑफर दिली आहे. ही ऑफर सर्व कर्मचाऱ्यांसाठी नाही. एका विशिष्ट अनुभव पातळीची पूर्तता करणाऱ्या म्हणजेच स्तर ७० किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आहे. कंपनीच्या सुमारे 27 कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीत कार्यरत असलेल्या भारतासह  जगभरातील विविध देशांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येणार आहे. 

26 ऑक्टोबर रोजी कंपनीने ऐच्छिक राजीनामा योजना जाहीर केली. पात्र कर्मचाऱ्यांना कंपनी सोडायची की नाही, हे ठरवण्यासाठी डिसेंबरपर्यंत मुदत दिली जाणार आहे. नोकरी सोडण्याची ऑफर स्विकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना 31 डिसेंबर रोजी कंपनीतून सेवामुक्त केले जाणार आहे. या योजनेअंतर्गत किती कर्मचारी कंपनी सोडतील, याचे कोणतेही टार्गेट कंपनीने जाहीर केलेले नाही. 60,000 कर्मचाऱ्यांना ही ऑफर देण्यात आल्याचे समजते. 

कोणत्या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार

कमर्शियल बिजनेस, सिक्योरिटी आणि डिस्कवरी एंड क्वांटम टीमचे कर्मचारी,  Copilot, CoreAI, Windows + Devices, Xbox, फायानान्स तसेच HR डिपार्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्तीची ऑफर देण्यात आली आहे.  यासह क्लाउड + एआय अशा विविध विभागातील हे कर्मचारी आहेत. 60 हजार कर्मचाऱ्यांना ही ऑफर देण्यात आली आहे. हे कर्मचारी भारत,  अमेरिका, युनायटेड आणि कॅनडा असा विविध देशांमध्ये कार्यरत आहेत. 

नोकरी सोडण्याची ऑफर स्विकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना काय मिळणार?

मायक्रोसॉफ्टच्या व्हीईओ प्रोग्राम अंतर्गत कंपनीने  60000 कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्याची ऑफर दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या पात्रतेनुसार सेवेरेन्स पॅकेज दिले जाणार आहेत. कर्मचाऱ्यांनी कंपनीत किती वर्ष काम केले यानुसार पगाराप्रमाणे बेसिक पॅकेज दिले जाणार आहे. यापूर्वी एप्रिल 2026 मध्ये मायक्रोसॉफ्टने  अमेरिकेतील निवडक कर्मचाऱ्यांसाठी ऐच्छिक सेवानिवृत्ती योजना जाहीर केली होती. कंपनीच्या अमेरिकेतील कर्मचाऱ्यांपैकी अंदाजे 7 टक्के कर्मचारी यासाठी पात्र होते. मात्र, जुलै महिन्यात 30 टक्के कर्माचारी या योजनेसाठी पात्र ठरले.  जुलैमध्ये, मायक्रोसॉफ्टने 4,800 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची योजना जाहीर केली. कंपनीने कर्मचारी कपातीचा कोणताही थेट निर्णय जाहीर केलेला नाही. 

कंपनीने कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय का घेतला?

मायक्रोसॉफ्ट कंपनी जगभरात डेटा सेंटर्स उभारत आहे. AI तंत्रज्ञानाचा देखील वापर करत आहे. AI आणि डेटा सेंटर्सच्या उभारणीसाठी कंपनी कोट्यावधीची गुंकवणूक करत आहे. यामुळे कंपनी मोठ्या प्रमाणात खर्च कपात करत आहे. यासाठी कंपनीने कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES