SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

₹11200+ कोटी खर्च करुन उभारलेल्या विमानतळाला मोदींचं नाव! Narendra Modi International Airport आहे कुठे? जाणून घ्या A To Z माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर यापूर्वी गुजरामधील अंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आहे. त्यानंतर आता मोदींचं नाव एका मोठ्या विमानतळाला देण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाने घेतला आहे. जाणून घ्या या विमानतळासंदर्भात...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Oct 10, 2026, 01:51 PM IST | Updated: Oct 10, 2026, 02:12 PM IST
Image Credit: राज्य मंत्रिमंडळाने घेतला मोठा निर्णय (प्रातिनिधिक फोटो)
Join

उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील जेवर येथे असलेले ग्रीनफील्ड नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव बदलण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली. 'या विमानतळाचं नाव बदलून 'नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय विमानतळ, नोएडा-जेवर' असे करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे', अशी माहिती आदित्यनाथ यांनी दिली. शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याचं आदित्यनाथ म्हणाले. या विमानतळाच्या उभारणीसाठी मंत्रिमंडळ पंतप्रधान मोदी यांचे आभारी आहे. हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक सेवेच्या 25 वर्षांच्या पूर्ततेच्या निमित्ताने घेण्यात आल्याचं योगींनी सांगितलं. 7 ऑक्टोबर रोजी हे 25 वर्षे पूर्ण झाली. हे विमानतळ उत्तर प्रदेशातील सर्वांत मोठं व देशातील एक प्रमुख विमान वाहतूक केंद्र म्हणून उदयास येणार आहे, असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला. 2047 पर्यंत नोएडा आंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्र विकसित करुन उत्तर प्रदेश आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी पूर्ण समर्पण, ऊर्जा आणि निष्ठेने निरंतर काम करण्याचा संकल्प मंत्रिमंडळ पुन्हा व्यक्त करत आहे, असे आदित्यनाथ यांनी नमूद केले.

कसं आहे हे विमानतळ?

हे विमानतळ दिल्ली इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळापासून सुमारे 70 ते 75 किलोमीटर दूर आहे. या विमानतळाच्या उद्घाटनाचा पहिला टप्पा 28 मार्च 2026 रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. 15 जून 2026 रोजी पहिलं उड्डाण इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाने घेतलं. या विमानाने लखनौ ते जेवरदरम्यान उड्डाण केलं. पहिल्या टप्प्याची क्षमता सुमारे 1.2 कोटी प्रवासी प्रति वर्ष इतकी आहे. पहिल्या टप्प्यासाठी सुमारे ₹11200 कोटींहून अधिक खर्च करण्यात आलेत.

कोणी उभारलं आहे? देशातील असं पहिलं विमानतळ जे...

हे विमानतळ पीपीपी तत्वावर उभारण्यात आलं असून यमुना इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या विमानतळाची मुख्य विकासक कंपनी आहे. झुरिच एअरपोर्ट इंटरनॅशनल एजी ही उपकंपनी आहे. 2050 पर्यंत सुमारे 7 कोटी प्रवासी प्रति वर्ष या विमानतळावरुन प्रवास करतील असा अंदाज आहे. या विमानतळाचा मल्टी-रनवे विस्तार होणार आहे. हे विमानतळ यमुना एक्सप्रेसवे व इतर मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटीने जोडलेले आहे. या नामांतरामुळे हे भारतातील पहिले विमानतळ ठरणार आहे जे कार्यरत पंतप्रधानांच्या नावाने ओळखले जाईल. नाव बदलत असलं तरी आयएटीए कोड डीएक्सएन (DXN) मात्र बदलणार नाही  दिल्लीचे इंदिरा गांधी, लखनौचे चौधरी चरण सिंह ही माजी पंतप्रधानांच्या नावाने विमानतळे आहेत.

नाव बदलण्यासाठी या गोष्टी आवश्यक

राज्य कॅबिनेटची मंजुरी ही पहिली पायरी आहे. पूर्ण कायदेशीर नामांतरासाठी राज्य विधानसभेचा ठराव, केंद्र सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाची मंजुरी, गृह मंत्रालय व इतर एजन्सींकडून एनओसी आणि शेवटी भारत सरकारच्या राजपत्रात अधिसूचना आवश्यक आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES