SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

युट्यूबर ध्रुव राठीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर राऊतांनी एका वाक्यात दिली प्रतिक्रिया, म्हणाले 'नामर्द सरकार...'

दिल्लीतील जंतर-मंतर येथे 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (CJP) आंदोलनापूर्वी युट्युबर ध्रुव राठीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याने या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला होता.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Oct 10, 2026, 11:35 AM IST | Updated: Oct 10, 2026, 11:41 AM IST
Join

युट्युबर ध्रुव राठीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 'सीजेपी'च्या (CJP) आंदोलनापूर्वी दिल्लीत ही कारवाई करण्यात आली, दिल्ली आणि गुरुग्राम पोलिसांचे 30 हून अधिक कर्मचारी ध्रुव राठीच्या निवासस्थानी पोहोचले आणि ताब्यात घेतले. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना केंद्र सरकारवर टीका केली आहे. माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांना याबाबत विचारलं असता हे सरकार नामर्द असल्याचं म्हटलं. "सरकार दुसरं काय करु शकतं. एकदा सरकारला नामर्द ठरवल्यानंतर पोलीस बळाचा वापर करत आंदोलन दडपू शकतात," अशी टीका त्यांनी केली.

ध्रुव राठी यांना ताब्यात घेतल्याच्या वृत्ताला पोलीस प्रवक्त्याने दुजोरा दिला आहे. राठी अलीकडेच भारतात परतला होता. 8 ऑक्टोबर रोजी त्याने बेंगळुरू येथील फ्रीडम पार्क येथे आयोजित 'सीजेपी'च्या एका कार्यक्रमात हजेरी लावली होती आणि तिथे भाषणही केले होते. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी 'सीजेपी'ने या आंदोलनाची हाक दिली होती.

ध्रुव राठी यांना ताब्यात घेतल्याच्या घटनेवर आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनीही संतपा व्यक्त केला आहे. संजय सिंह यांनी एक्स पोस्टमध्ये लिहिलं आहे की,  "एका चोराने दुसऱ्याला वाचवण्यासाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. मोदीजींनी देशातील तरुणांचा प्रबळ आवाज असलेल्या ध्रुव राठी यांना अटक केली आहे. मोदीजी, तरुणांच्या रोषाशी खेळू नका; याचे परिणाम चांगले होणार नाहीत. 'मोदी-ज्ञानू' या मते चोरणाऱ्या जोडीची सत्ता नक्कीच संपुष्टात येईल."

 

 

दुसऱ्या एका पोस्टमध्ये संजय सिंह यांनी लिहिले: "कोणत्याही देशात एखाद्या चोराला इतका मान-सन्मान मिळताना तुम्ही कधी पाहिले आहे का? चोरांना पकडणे हे पोलिसांचे काम असते, तरीही मोदींनी एका 'चोरा'ला वाचवण्यासाठी संपूर्ण देशाचे पोलीस दल तैनात केले आहे. मोदीजी, 'ज्ञानू चोर'शी तुमचे काय नाते आहे? हे 'चोर-चोर मावस भाऊ' असल्यासारखे नाते आहे का? एकेकाळी आपण ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला होता; आता आपण चोरांविरुद्ध लढा देऊ".

 

 

CJP ने काय सांगितले?

CJP ने सांगितले की, आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी युट्युबर ध्रुव राठी याला गुरुग्राममधील त्याच्या घरातून ताब्यात घेतले. सकाळी साधारण 8 वाजता साध्या वेशातील सुमारे 50 पोलीस कर्मचारी तिथे पोहोचले होते.

ध्रुव राठी याने शुक्रवारी इंडिया गेटवरून एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यात त्याने विचारले होते, "तुम्ही उद्यासाठी तयार आहात का? मी आलो आहे." पोलिसांच्या या कारवाईवर भाष्य करताना त्याने मेट्रो स्थानके बंद करण्यासारख्या उपाययोजनांवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि पंतप्रधानांकडून करण्यात आलेल्या तयारीवर टीका केली.

दुसऱ्या एका पोस्टमध्ये तो म्हणाला, "50 मेट्रो स्थानके बंद, गाड्या रद्द, बसेस रद्द, सीमा सील आणि 1000 हून अधिक लोकांना ताब्यात घेतले. मोदी, तुम्ही इतके घाबरलेले का आहात? तुमच्या आयटी सेलचा दावा होता की आमच्या आंदोलनाला फारसे कोणी येणार नाही—मग ही सर्व तयारी कशासाठी?"

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES