SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

ना OTP, ना कॉल... तुमचा एक 'NO' मेसेज खाली करेल बँक अकाऊंट; NO Scam हा काय प्रकार? पोलिसांनीच सांगितलं कशी होते फसवणूक

तुम्ही व्हॉट्सअपवर पाठवलेला एक मेसेज तुमचं खातं रिकामं करण्यासाठी पुरेसा आहे. ना ओटीपी पाठवण्याची गरज, ना फोन कॉलवरुन माहिती घेणार थेट तुमचं खातं रिकामं होणार, नक्की कशी होते ही फसवणूक जाणून घ्या ए टू झेड माहिती...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Oct 15, 2026, 01:09 PM IST | Updated: Oct 15, 2026, 01:37 PM IST
Image Credit: पोलिस अधिकाऱ्यानेच सांगितलं नेमका हा प्रकार काय
Join

'सोशल मिडिया: शाप की वरदान' असा विषय दिल्यास नेमकं काय लिहावं असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक गोष्टी सहज शक्य झाल्या असल्या तरी याच माध्यमातून ऑनलाइन आर्थिक गंडा घालणाऱ्यांची संख्याही बरीच आहे. रोज हे सायबर चोर नवीन माध्यमातून लोकांना गंडा घालताना दिसतात. अशाच एका नव्या स्कॅमबद्दल हैदराबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी लोकांना सतर्क केलं आहे. सज्जनार यांनी सोमवारी, 12 ऑक्टोबर रोजी एका नवीन पद्धतीच्या सायबर फसवणुकीबाबत जनतेला सावध करणारा संदेश दिला आहे.

क्षणात तुमच्या बँक खात्यातील पैसे गायब

"केवळ एका व्हॉट्सॲप मेसेजला 'NO' (नाही) असे उत्तर दिल्याने काही क्षणात तुमच्या बँक खात्यातील सर्व पैसे गायब होऊ शकतात!" असं सज्जनार यांनी म्हटलं आहे. सज्जनार यांनी या नव्या 'No Scam' बद्दल माहिती देताना, पीडित व्यक्तीने ना कोणताही ओटीपी (OTP) शेअर केला होता, ना कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक केले होते. त्याने फक्त 'NO' असे टाईप केले आणि त्यांची आयुष्यभराची कमाई लुटली गेली, असं सज्जनार यांनी घडलेल्या प्रकरणाची माहिती देताना म्हटलं आहे.

नक्की काय असतं या मेसेजमध्ये?

आपल्या अधिकृत एक्स पोस्टमधून सज्जनार यांनी या नव्या सायबर फ्रॉडची माहिती दिली आहे. "मला अलीकडेच एका नवीन प्रकारच्या सायबर गुन्ह्याबद्दल माहिती मिळाली. ज्यामध्ये एका चार्टर्ड अकाउंटंटची फसवणूक झाली. यात सायबर गुन्हेगारांनी तंत्रज्ञानाचा वापर करून अत्यंत धोकादायक 'ऑटो-एक्झिक्युशन फाइल अटॅक' पद्धतीचा वापर केला," असं हैदराबादचे पोलीस आयुक्त म्हणाले. अधिक माहिती देताना सज्जनार यांनी सांगितले की, सुरुवातीला संभाव्य पीडित व्यक्तीला अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सॲपवर एक मेसेज येतो. या मेसेजमध्ये त्या व्यक्तीच्या बँक खात्यातून ठराविक रक्कम वजा झाल्याचे (डेबिट झाल्याचे) नमूद केलेले असते. त्यानंतर लगेचच दुसरा मेसेज येतो: "जर हा व्यवहार (ट्रानझॅक्शन) तुम्ही केलं नसेल, तर त्वरित 'NO' असे उत्तर द्या," असं सांगितलं जातं.

NO पाठवल्यावर काय होतं?

ज्या क्षणी घाबरुन व्यक्ती तातडीने 'NO' असे टाईप करून या मेसेजला रिप्लाय पाठवतो, त्या क्षणी मेसेजमध्ये लपवलेल्या 'मालवेअर स्क्रिप्ट्स सक्रिय होतात. "काही सेकंदातच हॅकर्स तुमच्या मोबाईल फोनवर पूर्ण ताबा मिळवतात आणि तुमच्या बँक खात्यातील सर्व पैसे काढून घेतात," असे सज्जनार यांनी एक्सवरुन इशारा देताना सांगितले.

 

 

काय करावे आणि काय करू नये?

बँक व्यवहारांशी संबंधित अनोळखी क्रमांकांवरून आलेल्या मेसेजला 'YES' (हो) किंवा 'NO' (नाही) असे उत्तर देऊ नये, असे आवाहन हैदराबादच्या आयुक्तांनी केले.

सज्जनार यांनी असा मेसेज आल्यास काय करावं हे ही सांगितलं आहे. अशा मेसेजला घाबरून 'YES' (हो) किंवा 'NO' (नाही) असा प्रतिसाद देण्याऐवजी, लोकांनी असे क्रमांक 'ब्लॉक' करावेत. त्या क्रमांकांशी झालेले चॅट्स (संवाद) 'डिलीट' करावेत, असं सज्जनार यांनी सुचवलं आहे.

तसेच, अशा संशयास्पद मेसेजला उत्तर देण्याऐवजी, खरोखरच काही पैसे वजा झाले आहेत का, हे तपासण्यासाठी थेट बँकिंग ॲपवरुन बॅलेन्स तपासून घ्यावे, असंही सज्जनार यांनी सुचवलं आहे.

"कोणतीही अधिकृत बँक व्हॉट्सॲपद्वारे अशी माहिती मागत नाही. जर तुम्ही या फसवणुकीचे बळी ठरलात, तर विलंब करू नका; 'गोल्डन अवर'मध्ये (फसवणूक झाल्यानंतरचा पुढील साधारण तासभराच्या वेळेत) सायबर हेल्पलाईन क्रमांक '1930' वर कॉल करा किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा," असं आवाहन सज्जनार यांनी लोकांना केलं आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES