SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

अर्शदीप दुखापतीमुळे संघाबाहेर, बीसीसीआयने केली बदली खेळाडूची घोषणा! स्टार खेळाडू संघात सामील

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये होणारा निर्णायक सामन्याआधी टीम इंडियामध्ये मोठी घोषणा करण्यात आली आहे. चौथ्या सामन्यामध्ये झालेल्या दुखापतीमुळे आता अर्शदीप सिंग हा मालिकेमधून बाहेर झाला. आता बीसीसीसआयने सामन्याच्या एक दिवसाआधी मोठी घोषणा केली आहे.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Oct 16, 2026, 03:19 PM IST | Updated: Oct 16, 2026, 03:52 PM IST
Join

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सुरु असलेल्या टी20 मालिकेचा शेवटचा निर्णायक सामना हा काही तासांमध्ये खेळवला जाणार आहे. चौथ्या सामन्यामध्ये झालेल्या दुखापतीमुळे आता अर्शदीप सिंग हा मालिकेमधून बाहेर झाला. आता बीसीसीसआयने सामन्याच्या एक दिवसाआधी मोठी घोषणा केली आहे, टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार भारतीय संघात अर्शदीप सिंगचा बदली खेळाडू म्हणून घोषणा केली आहे. न्यूझीलंडला रवाना होण्यापूर्वीच त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे आणि उद्या, शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी वेस्ट इंडिजविरुद्धच्या अंतिम टी२० सामन्यात तो खेळताना दिसण्याची दाट शक्यता आहे. याचे कारण असे की, वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग जखमी आहे, त्यामुळे त्याच्या खेळण्याची शक्यता खूपच कमी झाली आहे.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सुरु असलेल्या मालिकेच्या पाचव्या सामन्याआधी बीसीसीआयने त्यांच्या सोशल मिडियावर अधिकृत पोस्ट शेअर केली आहे यामध्ये बीसीसीआयने लिहीले आहे की, भारताचा खेळाडू अर्शदीप सिंगच्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे भुवनेश्वर कुमारला पाचव्या कसोटीसाठी संघात सामील करण्यात आले आहे. 

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सुरु असलेली मालिका निर्णायक सामन्यावर पोहोचली आहे. या दोन्ही संघामध्ये 5 सामन्यांच्या मालिकेचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये  सामना भारताच्या संघाने जिंकले आहेत तर चौथ्या सामन्यामध्ये वेस्ट इंडिजच्या संघाने सामना जिंकून मालिकेमध्ये बरोबरी केली आहे आता दोन्ही संघासाठी हा मालिकेचा शेवटचा सामना करो या मरो असणार आहे. दोन्ही संघांना या शेवटच्या सामन्यामध्ये मालिका जिंकण्याची संधी असणार आहे त्यामुळे आता दोन्ही संघाच्या कामगिरीवर सर्वांची नजर असणार आहे.  

हे ही वाचा

स्मृती मानधना करणार नव्या पर्वाला सुरुवात, कधी आणि कुठे पाहता येणार IND vs ZIM सामना?

भारताचा अपडेटेड टी20 संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशन (विकेटकिपर), संजू सॅमसन (विकेटकिपर), तिलक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, नितीश कुमार रेड्डी, प्रिन्स यादव, अर्शदीप सिंग, मयंक यादव, नमन धीर, भुवनेश्वर कुमार.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES