IND vs ZIM : प्रतिका रावलने ठोकले शतक, झिम्बाब्वेविरुद्ध 9 विकेट्सने टीम इंडियाने मिळवला विजय
भारताने झिम्बाब्वेविरुद्ध सामन्यामध्ये फक्त एक विकेट गमावला आणि सामना जिंकला. प्रतिका रावलने शानदार शतक झळकावले. रावलच्या शतकामुळे भारताने सहज सामना जिंकला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
भारत महिला संघ विरुद्ध झिम्बाब्वे महिला संघाचा एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना आज पार पडला. या सामन्यामध्ये भारताच्या संघाने विजयी सुरुवात करुन मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामना 23 ऑक्टोबर रोजी वडोदरा येथे झाला. भारताने उत्कृष्ट कामगिरी करत 9 गडी राखून विजय मिळवला. भारतीय संघाची गोलंदाजी तर या सामन्यामध्ये प्रभावशाली पाहायला मिळालीच त्याचबरोबर टीम इंडियाची फलंदाजी देखील कमालीची होती. भारताने या सामन्यामध्ये फक्त एक विकेट गमावला आणि सामना जिंकला. प्रतिका रावलने शानदार शतक झळकावले. रावलच्या शतकामुळे भारताने सहज सामना जिंकला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या झिम्बाब्वेचा संघ 49.5 षटकांत 197 धावांवर सर्वबाद झाला. प्रथम, भारतीय गोलंदाजांनी झिम्बाब्वेला 197 धावांवर रोखले, त्यानंतर प्रतीका रावलचे शतक आणि शफाली वर्माच्या वादळी खेळीच्या जोरावर भारताने अवघ्या 27.1 षटकांत लक्ष्य गाठले. बिलव्हेड बिझाने 92 चेंडूंमध्ये 62 धावा करून सर्वाधिक धावा केल्या. मॉडेस्टर मुपाचिकवाने 25, तर मिचेल मावुंगाने 29 धावा केल्या. भारतीय गोलंदाजांची या सामन्यामध्ये प्रभावशाली कामगिरी पाहायला मिळाली आता टीम इंडियाने या सामन्यात कशी कामगिरी केली या सामन्यात सविस्तर अहवाल वाचा.
हे ही वाचा
आशियाई पॅरा गेम्समध्ये ऐतिहासिक कामगिरी! भारताने 114 पदके आणि 30 गोल्ड मेडल जिंकून नवा विक्रम केला प्रस्थापित
पहिल्या इंनिंगमध्ये भारताच्या गोलंदाजांनी जोर दाखवला, त्यानंतर 198 धावांचे लक्ष्य गाठताना भारतीय महिला संघाने दमदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. सलामीवीर प्रतीका रावलने शानदार शतक झळकावून संघाची सूत्रे हाती घेतली आणि शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिली. तिच्या खेळीमुळे संघाचा विजय निश्चित झाला. प्रतीकाने कर्णधार स्मृती मंधानासोबत पहिल्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी केली. मंधाना बाद होण्यापूर्वी 32 धावा करून संघाला एक भक्कम सुरुवात करून दिली.
भारताची कर्णधार स्मृती मानधना बाद झाल्यानंतर शेफाली वर्मा फलंदाजीला आला, प्रतिका रावल चांगल्या फार्ममध्ये पाहायला मिळाली. मंधाना बाद झाल्यानंतर शफाली वर्मा प्रतीकासोबत फलंदाजीला आली. दोन्ही फलंदाजांनी झटपट धावा केल्या आणि झिम्बाब्वेच्या गोलंदाजीवर दबाव कायम ठेवला. शफाली 64 धावांवर नाबाद राहिली, तर प्रतीकाने आपले शतक पूर्ण करून संघाला विजय मिळवून दिला. यामध्ये प्रतिकाने 14 चौकार मारले. भारतीय महिला संघाने 27.1 षटकांत एक गडी गमावून 200 धावा पूर्ण केल्या आणि हा सामना नऊ गडी राखून जिंकला.