SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

न्यूझीलंड दौऱ्याआधी टीम इंडियाची डोकेदुखी वाढली! हर्षा भोगलेंचे टीमनिवडीवर गंभीर प्रश्न

न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी टीम इंडियाची तयारी सुरू असतानाच टीम निवडीवर सध्या मोठी चर्चा रंगलेली दिसतेय.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Oct 21, 2026, 07:20 PM IST | Updated: Oct 21, 2026, 07:34 PM IST
Image Credit: टीम निवडीवर सध्या मोठी चर्चा
Join

न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी टीम इंडियाची तयारी सुरू असतानाच टीम निवडीवर सध्या मोठी चर्चा रंगलेली दिसतेय. भारताचे प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी विविध क्रिकेट प्रकारांसाठी वेगवेगळ्या टीम निवडताना काही महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष झाल्याचं मत मांडलंय. विशेषतः देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी करणाऱ्या आकिब नबीला कसोटी टीमत संधी न मिळाल्याबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केला. त्याचबरोबर मोहम्मद शमीच्या पुनरागमनाचा मुद्दा, भुवनेश्वर कुमारची टी-२० टीममधीलतील निवड आणि ऋषभ पंतच्या फिटनेसची समस्याही चर्चेत आली आहे. नेमकं काय म्हणालेयत हर्षा भोगले? सविस्तर जाणून घेऊया.

सहा आठवड्यांचा दौरा, 12 सामने; भारतासमोर मोठं आव्हान

टीम इंडियाचा न्यूझीलंड दौरा 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून तो 1 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या दौऱ्यात पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामने, पाच एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. वेगवेगळ्या क्रिकेट प्रकारांसाठी  टीममध्य बदल करण्यात आले आहेत.

आकिब नबीला कसोटी टीममध्ये संधी का नाही?

देशांतर्गत क्रिकेटमध्ये लाल चेंडूने प्रभावी कामगिरी करणाऱ्या आकिब नबीला कसोटी टीममध्ये स्थान न मिळाल्याबद्दल हर्षा भोगले यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्या मते, न्यूझीलंडमधील परिस्थितीत नबीसारखा गोलंदाज भारतासाठी उपयुक्त ठरू शकला असता.

मोहम्मद शमीच्या पुनरागमनाचा प्रश्न कायम

मोहम्मद शमी देशांतर्गत क्रिकेटमध्ये विकेट घेत असताना त्याला भारतीय टीममध्ये संधी का मिळत नाही?, असा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जातa/. हर्षा भोगले यांनी या संदर्भात शमीच्या गोलंदाजीच्या स्पेलमधील वेग आणि धार याबाबत काही क्रिकेट जाणकारांच्या निरीक्षणांचा उल्लेख केला. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये दीर्घकाळ गोलंदाजी करण्यासाठी शमी पूर्णपणे तयार आहे का, हा मुद्दा महत्त्वाचा ठरू शकतो, असेही ते यावेळी म्हणाले.

भुवनेश्वर कुमारची निवड मग शमीला काय संदेश?

भुवनेश्वर कुमारचा टी-20 टीममध्ये समावेश झाल्यानेही चर्चा सुरू झाली आहे. हर्षा भोगले यांच्या मते, भुवनेश्वर चार ओव्हरच्या मर्यादित स्वरूपातील क्रिकेटसाठी स्वतःला तयार ठेवत आहे. टी-20 आणि कसोटी क्रिकेटच्या गरजा वेगवेगळ्या असल्याने एका प्रकारात खेळण्याची तयारी म्हणजे दुसऱ्या प्रकारासाठीही खेळाडू पूर्णपणे तयार आहे, असं म्हणता येत नाही. त्यामुळे गोलंदाजांची निवड करताना त्यांची भूमिका, तंदुरुस्ती आणि विशिष्ट प्रकारातील उपयुक्तता यांचा स्वतंत्र विचार आवश्यक असल्याचे हर्षा भोगले म्हणाले.

शुभमन गिलच्या तयारीचं आव्हान

ऋषभ पंतच्या फिटनेसविषयक अडचणी टीम इंडियासाठी चिंतेचा विषय असल्याचं हर्षा भोगले यांनी नमूद केलं. पंतसारखा सामन्याचं चित्र बदलू शकणारा फलंदाज उपलब्ध नसल्यास संघाच्या नियोजनावर परिणाम होऊ शकतो. दुसरीकडे, शुभमन गिल पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांत नेतृत्व करणार असल्याने त्याला लाल चेंडूच्या क्रिकेटसाठी पुरेसा सराव मिळेल का, हा प्रश्नही उपस्थित झाला आहे. भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यात संघनिवड, खेळाडूंचं व्यवस्थापन आणि कसोटी मालिकेपूर्वीची तयारी यांची कसोटी लागणार आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.

ZEENEWS TRENDING STORIES