SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

भारत-पाकिस्तान सामना: राष्ट्रवाद की केवळ अर्थकारणाचा खेळ?

भारत-पाकिस्तान सामन्यांमागचं हे कोट्यवधींचं अर्थकारण नवं नाही; वर्षानुवर्षे याच गणितावर बीसीसीआय आणि पीसीबीची तिजोरी भरत आली आहे.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Nov 25, 2026, 06:04 IST | Updated: Nov 25, 2026, 06:13 IST
Join

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना वाद (दीपक कापुरे) - सध्या भारत आणि न्यूझीलंड कसोटी मालिका सुरू असली तरी, क्रिकेटप्रेमींचं लक्ष मात्र दोहामधील 'आशिया चषक रायझिंग स्टार्स' स्पर्धेकडे लागलं आहे. या उत्सुकतेमागचं मुख्य कारण म्हणजे पुन्हा एकदा 'मौका मौका'... अर्थातच भारत-पाकिस्तानचा हाय-व्होल्टेज महामुकाबला! साखळी फेरीत पाकिस्तान-अ संघाने भारत-अ संघावर मात केली असली, तरी अंतिम सामन्यात हे दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा आमनेसामने येण्याची शक्यता आहे. लाखो भारतीय चाहते टीव्हीवर हा थरार 'याचि देही याचि डोळा' अनुभवतील, तर अनेक प्रायोजक आणि प्रसारण हक्कांच्या माध्यमातून पैशांचे इमले उभारले जातील. भारत-पाकिस्तान सामन्यांमागचं हे कोट्यवधींचं अर्थकारण नवं नाही; वर्षानुवर्षे याच गणितावर बीसीसीआय आणि पीसीबीची तिजोरी भरत आली आहे.

गेल्या काही वर्षांत दहशतवादी कारवायांमुळे भारतानं पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली, आणि त्याचा थेट परिणाम क्रिकेटवरही झाला. आयसीसी आणि एसीसीच्या बहुराष्ट्रीय स्पर्धा वगळता द्विपक्षीय मालिका खेळू नयेत, अशी भूमिका घेत बीसीसीआयनेही सरकारच्या सुरात सूर मिसळला. त्यामुळेच केवळ वर्ल्डकप आणि आशिया चषकापुरतेच भारत-पाकिस्तान सामने मर्यादित राहिले. त्यातच भारतीय खेळाडूंच्या 'नो हॅंडशेक' भूमिकेमुळे खिलाडूवृत्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं, आणि त्यातच भारताच्या हक्काच्या ट्रॉफी मोहसीन नक्वीने ताब्यात घेतल्याच्या वादाने आगीत तेल ओतण्याचं काम केलं.

हे ही वाचा

6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,6... प्रियांश आर्याच्या बॅटमधून षटकारांचा पाऊस! 36 चेंडूत ठोकलं शतक

भारत-पाकिस्तान क्रिकेटमधील ताणलेल्या संबंधांचं हे झालं वरवरचं किंवा 'भासवलं जाणारं' चित्र! प्रत्यक्षात मात्र, मुख्य संघ एकमेकांविरुद्ध खेळत नसले तरी अंडर-१९ वर्ल्डकप, अंडर-१९ आशिया चषक आणि आता 'आशिया चषक रायझिंग स्टार्स'च्या निमित्ताने दोन्ही देशांचे संघ मैदानावर भिडतच आहेत आणि दोन्हीकडचे चाहते याचा मनमुराद आनंद लुटत आहेत.

त्यामुळेच, हा बीसीसीआय आणि पीसीबीचा उघड दुटप्पीपणा आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कोणत्या ना कोणत्या निमित्ताने पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान सामना रंगवून काढण्यासाठी दोन्ही बोर्डांमध्ये छुपी हातमिळवणी होताना दिसते. यातून मिळणारा महसूल श्रीमंत बीसीसीआयसाठी अगदीच किरकोळ असला, तरी आर्थिक अडचणीत असलेल्या पीसीबीसाठी तो 'ऑक्सिजन' ठरतो. बीसीसीआय पडद्यामागून पीसीबीसाठी कमाईची दारं खुली करते आणि पीसीबीही ती तितक्याच कृतज्ञतेने स्वीकारते. दोन्ही बोर्डाचे पदाधिकारी एकत्र भेटतात, संवाद साधतात आणि पार्ट्याही रंगतात. असं असतानाही, मैदानावर मात्र भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करायचं नाही, आणि मोहसीन नक्वीही भारताच्या हक्काच्या ट्रॉफी परत करायला तयार नाहीत.

एकूणच काय, तर हा केवळ दुटप्पीपणा नसून खेळाडू, चाहते आणि 'जंटलमन गेम' मानल्या जाणाऱ्या क्रिकेटचा हा एक प्रकारचा अवमानच नाही का?

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES