न्यूझीलंड ODI अन् कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, विराट-रोहित पुन्हा दिसणार खेळताना!
भारत विरुद्ध न्यूझीलंड आगामी एकदिवसीय मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे या मालिकेमध्ये काही महत्त्वाचे बदल पाहायला मिळाले आहेत.
भारताचा संघ काही दिवसात न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे, बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी भारतीय टी20 संघाची घोषणा केली होती. भारताच्या एकदिवसीय संघाची बीसीसीआयने घोषणा केली आहे, या स्पर्धेमध्ये भारताचा संघ दोन कर्णधारांसह मैदानामध्ये उतरणार आहे, टीम इंडियाचा पहिल्या तीन सामन्यासाठी कर्णधार शुभमन गिल असणार आहे तर त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या सामन्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार बदलणार आहे, याची घोषणा बीसीसीआयने अधिकृतपणे करण्यात आली आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये एकदिवसीय मालिका ही पाच सामन्यांची होणार आहे. या सामन्याच्या पहिल्या तीन सामन्यामध्ये शुभमन गिल कर्णधारपद सांभाळणार आहे तर चौथ्या आणि पाचव्या सामन्यामध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद हे श्रेयस अय्यर सांभाळणार आहे. त्याचबरोबर रुतुराज गायकवाडला देखील या मालिकेमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. एकदिवसीय मालिकेचा जसप्रीत बुमराह भाग नाही तो फक्त कसोटी मालिकेमध्ये खेळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मोहम्मद सिराज एकदिवसीय मालिकेचा भाग असणार आहे.
हे ही वाचा
IND vs ZIM सामन्यात का बांढली होती खेळाडूंनी हाताला काळी पट्टी? वाचा कारण
पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी भारताचा एकदिवसीय संघ : शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, नमन धीर, अंशुल कंबोज, गुरनूर ब्रार, रुतुराज गायकवाड, अर्शदीप सिंह, ईशान किशन (विकेटकीपर), मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा*, कुलदीप यादव.
चौथ्या आणि पाचव्या एकदिवसीय सामन्यांसाठी भारताचा एकदिवसीय संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, तिलक वर्मा, इशान किशन (उपकर्णधार), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, नमन धीर, आकिब नबी, गुरनूर ब्रार, ऋतुराज गायकवाड़, अर्शदीप सिंह, कुमार कुशाग्रा (विकेटकीपर), मोहम्मद सिराज, यश ठाकुर, कुलदीप यादव.
बीसीसीआयने कसोटी संघाची देखील घोषणा केली आहे, यामध्ये जसप्रीत बुमराह खेळताना दिसणार आहे, त्याचबरोबर जखमी झालेला साई सुदर्शन संघामध्ये परतला आहे. अंशुल कंबोज देखील कसोटी संघाचा भाग आहे. ऋषभ पंत पूर्णपणे बरा आहे की नाही यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे.
भारताचा कसोटी संघ: शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल [उपकर्णधार], देवदत्त पडिक्कल, ऋषभ पंत (विकेटकिपर)*, ध्रुव जुरेल (विकेटकिपर), रवींद्र जडेजा, अंशुल कंबोज, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, साई सुदर्शन, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.