W,W,W... तुषार देशपांडेची हॅट्रीक! मुंबईसाठी रचला इतिहास
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने ४२९ धावा केल्या आणि त्यानंतर तुषार देशपांडेने पाहुण्या चंदीगड संघाला धक्का दिला. दुसऱ्याच दिवशी त्याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
रणजी ट्रॅाफीच्या नव्या सिझनला सुरुवात झाली आहे, आता या स्पर्धेमध्ये काही खेळाडूंची दमदार कामगिरी पाहायला मिळाली आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियम या रणजी ट्रॅाफी सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. सर्वाधिक रणजी ट्रॉफी विजेतेपदे पटकावणाऱ्या मुंबई संघाने या स्पर्धेच्या नव्या हंगामात शानदार सुरुवात केली आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने ४२९ धावा केल्या आणि त्यानंतर तुषार देशपांडेने पाहुण्या चंदीगड संघाला धक्का दिला. चंदीगडने अवघ्या 37 धावांत 7 गडी गमावले, ज्यात तुषार देशपांडेने कहर करत शानदार हॅट-ट्रिक घेत इतिहास रचला. रणजी ट्रॉफीमध्ये हॅट-ट्रिक घेणारा तो मुंबईचा सहावा गोलंदाज ठरला.
मुंबईच्या तुषार देशपांडेने सामन्यावर वर्चस्व गाजवले. त्याने हॅट-ट्रिक घेत चंदीगडच्या फलंदाजांना चकित केले. देशपांडे आता रणजी ट्रॉफीमध्ये हॅट-ट्रिक घेणारा मुंबईचा सहावा गोलंदाज ठरला आहे. एक प्रकारे, देशपांडेने आपल्या देशांतर्गत क्रिकेट कारकिर्दीत इतिहास रचला आहे. आयपीएलमध्ये 2026 च्या सिझनला तो राजस्थान रॅायल्सच्या संघाकडून खेळला होता. तुषार देशपांडेच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर विरोधी संघाच्या फलंदाजांनी पूर्णपण गुडघे टेकले होते. वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेच्या भेदक गोलंदाजीसमोर चंदीगडचे फलंदाज पूर्णपणे हतबल झाले होते. त्याने आपल्या सहाव्या षटकात अर्जुन आझाद, शिवम भांब्री आणि दीपेंद्र कुश यांना सलग तीन चेंडूंवर बाद करून हॅट-ट्रिक घेतली.
एका क्षणी, चंदीगडने 37 धावांत सात गडी गमावले होते. देशपांडेने आधी सलामीवीर अर्जुनला, मग शिवमला बाद केले. त्यानंतर त्याने तिसऱ्याच चेंडूवर दीपेंद्र कुशला बाद करून आपली हॅट-ट्रिक पूर्ण केली. देशपांडेने सामन्यात सात षटके गोलंदाजी करत 17 धावांत पाच बळी घेतले. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे चंदीगडचा संघ पहिल्या डावात 78 धावांवर गारद झाला. देशपांडेने पहिल्या डावात फलंदाजीनेही महत्त्वपूर्ण योगदान दिले, त्याने 47 चेंडूंमध्ये 44 धावा केल्या. फॉलो-ऑन दिल्यानंतर , मुंबईच्या 429 धावांच्या प्रत्युत्तरात चंदीगडचा संघ 75 धावांवर सर्वबाद झाला. तुषार देशपांडेने हॅट-ट्रिकसह प्रथम-श्रेणी सामन्यात सहाव्यांदा पाच बळी घेतले. मुंबईने फॉलो-ऑन दिल्यानंतर, दिवसाचा खेळ संपला तेव्हा चंदीगडने आपल्या दुसऱ्या डावात एकही धाव न काढता एक गडी गमावला होता.
मुंबईचे रणजी गोलंदाज ज्यांनी हॅट-ट्रिक घेतली
जहांगीर खोत वि बडोदा (1943-44)
उमेश कुलकर्णी विरुद्ध गुजरात (1963-64)
अब्दुल इस्माईल विरुद्ध सौराष्ट्र (1973-74)
रॉयस्टन डायस वि बिहार (2023-24)
शार्दुल ठाकूर वि मेघालय (2024-25)