वैभव सूर्यवंशीला न्यूझीलंड दौऱ्यावर संधी मिळणार का? माजी प्रशिक्षकाने सांगितलं स्पष्टच
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेच्या पाचही सामन्यांमध्ये वैभव सूर्यवंशीला खेळण्याची संधी मिळाली नाही. यावर आता भारताचे माजी प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी वैभव सूर्यवंशीला न्यूझीलंड दौऱ्यावर संधी मिळण्याच्या शक्यतेबद्दल बोलले आहेत.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये टी20 मालिका पार पडली, या सामन्यामध्ये भारताची सलामी जोडी संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या जोडीने टीम इंडियासाठी चांगली कामगिरी केली. इंग्लंडविरुद्ध झालेल्या मालिकेमध्ये भारताच्या संघाने टीम इंडियाचा सर्वात युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीला भारतीय संघात स्थान मिळाले आहे. त्यानंतर त्याला काही सामने खेळण्याची संधी मिळाली तर काही सामन्यांमधून त्याला वगळण्यात देखील आले होते. आशियाई खेळांमध्ये त्याला भारतीय कर्णधाराने खेळवले होते, पण नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेमध्ये त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
जेव्हापासून वैभव सूर्यवंशीचे आंतरराष्ट्रीय पदार्पण झाले आहे तेव्हापासून तो टीम इंडियाचा सदस्य आहे. वैभव भारतीय संघाचा भाग आहे पण त्याला खेळण्याच्या संधी कमी दिल्या जात आहेत. भारताचे माजी सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी वैभव सूर्यवंशीला न्यूझीलंड दौऱ्यावर संधी मिळण्याच्या शक्यतेबद्दल बोलताना सांगितले की, त्याला आपल्या संधीसाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागेल. वैभवने इंग्लंड दौऱ्यावर पदार्पण केले आणि तेव्हापासून तो संघासाठी आठ सामने खेळला आहे. तो आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या संघाचाही एक भाग होता, आता तो न्यूझीलंडविरुद्ध मालिकेसाठी भारतासोबत दौरा करणार आहे.
हे ही वाचा
झिम्बाब्वेविरुद्ध टीम इंडिया मालिका जिंकणार? वाचा कधी आणि कुठे पाहता येणार सामना?
भारत विरुद्ध न्यूझीलंडविरुद्ध यांच्यामध्ये 22 ऑक्टोबरपासून टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे, या मालिकेचा वैभव सूर्यवंशी भाग आहे. टीम इंडिया या दौऱ्यासाठी मंगळवारी 20 ऑक्टोबर रोजी रवाना होणार आहे, वैभव सूर्यवंशीने भारतीय संघासाठी आतापर्यत आठ सामने खेळले आहेत यामध्ये त्याने दोन अर्धशतके झळकावली आहेत. त्याने या सामन्यांमध्ये 186 च्या स्ट्राईक रेटने संघासाठी 246 धावा केल्या आहेत. त्याने आयपीएल 2026 मध्ये देखील दमदार कामगिरी केली होती, आयपीएल 2026 मध्ये तो सिझनमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. आयपीएल 2026 मध्ये त्याने धूमाकुळ घातला होता.
अभिषेक नायर जिओस्टारला म्हणाले, "तुम्ही प्रशिक्षक असाल किंवा कर्णधार, संघाच्या संस्कृतीसाठी अनेकदा योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे असते. जर तुम्ही विचार न करता निर्णय घेतले, तर त्याचा परिणाम केवळ वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीवरच नाही, तर संघाच्या संस्कृतीवरही खूप मोठा होईल. त्यामुळे, माझ्या मते, निर्णय असा असेल की, 'वैभव, तुझी वेळ येईल, तुला संधी मिळेल.' तो अशा मालिकेत खेळू शकतो जिथे संजू उपलब्ध नसेल किंवा त्याला विश्रांती दिली असेल."