IND vs WI 4th T20 सामना कधी आणि कुठे पाहता येणार? वाचा सामन्यांची संपूर्ण माहिती एका क्लिकवर
भारताच्या संघाची मालिकेमध्ये आघाडी आहे त्यामुळे आणखी एक विजयानंतर टीम इंडिया मालिकेत विजय मिळवण्याच्या सीमारेषेवर आहे. या मालिकेचा चौथा सामना कधी आणि कुठे पाहता येणार त्याचबरोबर खेळपट्टी कशी असणार यासंदर्भात सविस्तर माहिती या लेखामध्ये वाचा.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये टी20 मालिका सुरु आहे, भारताच्या संघाने तिसऱ्या सामन्यामध्ये विजय मिळवून मालिकेमध्ये आघाडी घेतली. टीम इंडियाची मालिकेमध्ये आघाडी आहे त्यामुळे संघाला मालिका जिंकण्यासाठी एक विजयाची गरज आहे. टीम इंडियाने कमालीची कामगिरी केली आहे पण भारताचा संघ गोलंदाजीमध्ये अडचणी येत आहेत. त्याचे कारण म्हणजेच टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह त्याचबरोबर हार्दिक पांड्यासारखे अनेक खेळाडू हे जखमी असल्यामुळे संघाचा भाग नाहीत त्यामुळे अनेक नव्या गोलंदाजांना भारतीय संघामध्ये स्थान मिळाले आहे. आता चौथा सामना कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर वाचा.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये होणार चौथा सामना हा वेस्ट इंडिजच्या संघासाठी करो या मरो असणार आहे त्याचे कारण म्हणजेच वेस्ट इंडिजच्या संघाला मालिकेमध्ये बरोबरी करण्याची संधी असणार आहे. तर भारताच्या संघाची मालिकेमध्ये आघाडी आहे त्यामुळे आणखी एक विजयानंतर टीम इंडिया मालिकेत विजय मिळवण्याच्या सीमारेषेवर आहे. या मालिकेचा चौथा सामना कधी आणि कुठे पाहता येणार त्याचबरोबर खेळपट्टी कशी असणार यासंदर्भात सविस्तर माहिती या लेखामध्ये वाचा.
कधी आणि कुठे पाहता येणार सामना?
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील चौथा टी20सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7.00 वाजता सुरू होईल. यापूर्वीचे तीन सामनेही याच वेळी सुरू झाले होते. यापूर्वी, सायंकाळी 6.30 वाजता दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील. चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनल्सवर हा सामना थेट पाहू शकतात. हा सामना जिओहॉटस्टारवर ऑनलाइनदेखील पाहता येईल.
कशी असेल हैदराबादची खेळपट्टी?
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील चौथा टी20 सामना 14 ऑक्टोबर रोजी हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियमवर खेळला जाईल. हैदराबादची खेळपट्टी साधारणपणे सपाट असते, ज्यामुळे फलंदाजांना मुक्तपणे धावा करता येतात. बॅट आणि बॉलचा संपर्क उत्तम होतो, परिणामी भरपूर चौकार आणि षटकार मारले जातात. या मैदानावर नेहमीच मोठी धावसंख्या होते. वेगवान गोलंदाजांसोबतच, फिरकी गोलंदाजांनाही वारंवार फटके बसतात. या मैदानावर धावा करणे खूप सोपे आहे, त्यामुळे हे फलंदाजांसाठी एक वरदान ठरते. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातही या मैदानावर मोठी धावसंख्या होण्याची शक्यता आहे.
हेड टू हेड आकडेवारी
भारतीय संघाने राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर तीन टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. टीम इंडियाने तिन्ही सामन्यांवर वर्चस्व गाजवत ते सहज जिंकले आहेत. या स्टेडियमवर भारताची सर्वोच्च टी20 आंतरराष्ट्रीय धावसंख्या 20 षटकांत 297 धावा आहे. 12 ऑक्टोबर 2024 रोजी भारताने बांगलादेशविरुद्ध धावांचा डोंगर उभा केला होता. त्या सामन्यात संजू सॅमसनने १११ धावांची खेळी केली होती. तो अजूनही संघाचा एक भाग आहे. तो वेस्ट इंडिजविरुद्ध आणखी एक मोठी कामगिरी करू शकतो.