SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

मैदानावर अभिषेक शर्माला डिवचणाऱ्या गोलंदाजाने मागितली माफी! म्हणाला - 'तुम्ही नाराज...' Video viral

अभिषेक शर्माला यूएईविरुद्ध सामन्यामध्ये डिवचणाऱ्या गोलंदाजासोबत भारतीय खेळाडूचा वाद झाला होता, आता त्याने सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे यामध्ये त्याने अभिषेकसोबतचा वाद मिटवला आहे.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Nov 25, 2026, 06:38 IST | Updated: Nov 25, 2026, 06:47 IST
Join

भारत अ विरुद्ध यूएई यांच्यामध्ये काल सामना परा पडला, या सामन्यामध्ये भारताच्या संघाने यूएईला 14.2 ओव्हरमध्ये खेळ संपवला आणि 7 विकेट्सने विजय मिळवला. यूएईविरुद्ध सामन्यामध्ये भारताचा एकटा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने 204 धावा ठोकल्या आणि सामना भारताला जिंकवून दिला. भारताने अभिषेक शर्माचा विकेट लवकर गमावला, अभिषेक शर्माने यूएईविरुद्ध सामन्यामध्ये 12 धावांची खेळी खेळली आणि विकेट गमावली. अभिषेक शर्माची विकेट गेल्यानंतर यूएईचा खेळाडू अभिषेकला डिवचण्याचा प्रयत्न करत होता यावेळचा व्हिडिओ सोशल मिडियावर चर्चेत होता, आता त्याने सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि अभिषेकची माफी मागितली आहे.

नक्की झाले काय मैदानावर?

भारताचा संघ दुसऱ्या डावामध्ये फलंदाजीला आहे, अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी दोघेही फलंदाजी करत होता. वैभव सूर्यवंशीने संघासाठी धमाकेदार सुरुवात केली आणि यूएईच्या संघावर सुरुवातीपासून दबदबा ठेवला. ही घटना भारताच्या डावाच्या चौथ्या षटकात घडली. चौथ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अभिषेक शर्मा पायचीत (LBW) बाद झाला. चेंडू उंच टप्पा पडल्याचे अभिषेकला वाटत होते आणि तो पंचांकडे आपला मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत होता, परंतु युएईच्या गोलंदाजाने त्याला तसे करण्यापासून रोखले आणि तिथूनच परिस्थिती चिघळली. अभिषेक शर्मा पंचांच्या निर्णयावर नाराज पाहायला मिळाला आणि तो पंचांकडे जात होता.

हे ही वाचा

6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,6... प्रियांश आर्याच्या बॅटमधून षटकारांचा पाऊस! 36 चेंडूत ठोकलं शतक

अभिषेक शर्माला अंपायरने बाद केल्यानंतर युएईचा गोलंदाज इब्रार अहमद त्याच्याकडे आला आणि त्याला मैदान सोडण्यास सांगितले. इब्रार अहमदच्या प्रतिक्रियेनंतर, अभिषेक शर्मा परत आला आणि त्याचा युएईच्या गोलंदाजाशी जोरदार वाद झाला. त्यानंतर यूएईचे काही खेळाडू आणि अंपायर हे या वादामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी मध्यात आले आणि त्यानंतर परिस्थिती निवळली.

इब्रार अहमदने शेअर केलेला व्हिडिओ

यूएईचा गोलंदाज इब्रार अहमदने सोशल मिडियावर अभिषेक शर्मासोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये अभिषेक शर्माने सुरुवातीलाच सांगितले की, यांनी आज मला बाद केले आहे, भावा अशीच कामगिरी कर असे अभिषेकने गोलंदाजाला सांगितले. पुढे यूएईचा गोलंदाज अभिषेकला सांगितले की, मी तुम्हाला बाद केले पण तुम्ही नाराज झाले माझ्यावर. यावर बोलताना अभिषेक गोलंदाजाला म्हणतो की, क्रिकेटच्या मैदानावर चालत हे संगळ खुप छान, त्यानंतर दोघेही हसले आणि त्यांच्यातील वाद मिटवला. 

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES