SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

200MP कॅमेरा, जबरदस्त आवाज; Motorola ने आणला जबरदस्त ऑलराऊंडर स्मार्टफोन Signature 27

Motorola Signature 27 हा एक 'फ्लॅगशिप' स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये प्रभावी प्रोसेसर, उत्कृष्ट दर्जाचा आवाज आणि 200-मेगापिक्सेलच्या टेलिफोटो कॅमेऱ्याचा समावेश असलेला जबरदस्त कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Oct 10, 2026, 09:14 AM IST | Updated: Oct 10, 2026, 09:16 AM IST
Join

भारतात सध्या इंडिया मोबाईल काँग्रेस 2026 सुरू आहे. येथे मोटोरोलाने Motorola Signature 27 हा एक दमदाक स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनी हा एक 'ऑल-राउंडर' फोन असल्याचं सांगितलं आहे. ज्यामध्ये एक प्रभावी प्रोसेसर, एक शक्तिशाली कॅमेरा आणि उत्कृष्ट साऊंड क्वालिटी आहे. Motorola Signature 27 मध्ये अनेक चांगले फिचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये क्वालकॉमच्या Snapdragon 8 Elite Extreme Gen 6 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. कंपनीचा दावा आहे की हा प्रोसेसर मल्टीटास्किंग क्षमता वाढवतो आणि गेमिंग दरम्यान चांगला परफॉर्मन्स देतो.

Motorola Signature 27 मध्ये चांगली कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी, -अँटेना सेटअपचा वापर केला आहे, ज्यामुळे कनेक्टिव्हिटीचा उत्तम अनुभव मिळतो. याव्यतिरिक्त, या डिव्हाइसमध्ये 'आर्क्टिक मेश' कूलिंग सिस्टीमचा समावेश आहे.

Motorola Signature 27 चा कॅमेरा

Motorola Signature 27 मध्ये Sony LYTIA 910 च्या 50MP कॅमेराचा वापर केला आहे, जो प्रायमरी कॅमेरा आहे. तसंच सोबत 200MP चा टेलिफोटो कॅमेरा दिला आहे. जो हाय रिझोल्यूशन कॅप्चर करण्यात मदत करतो.

फोटो आणि व्हिडिओ ब्लर होऊ नये यासाठी मोटोरोलाने 'मल्टी-स्टेज स्टॅबिलायझेशन आर्किटेक्चर'चा वापर केला आहे. या डिव्हाइसमध्ये 3.5-axis ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनची सुविधा आहे, जी कमी प्रकाशात कॅमेराची हालचाल नियंत्रित करते. तसेच, यात क्वालकॉम इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायझेशन आणि मोटोरोला व्हिडिओ एनहान्सड इंजिनचाही वापर करण्यात आला आहे.

डॅनिश कंपनीच्या सहकार्याने ऑडिओ हार्डवेअर

Motorola Signature 27 मध्ये उत्कृष्ट ऑडिओ दर्जा देण्यासाठी मोटोरोलाने डॅनिश ऑडिओ कंपनी 'बँग अँड ओलुफसेन' (Bang & Olufsen) सोबत भागीदारी केली आहे. या सहकार्यामुळे फोनमधील इन-बिल्ट स्पीकर्सची ऑडिओ कामगिरी अधिक सुधारली आहे.

या भागीदारीमुळे फोनच्या इन-बिल्ट स्पीकर्सचा ऑडिओ दर्जा उंचावला असून, मल्टिमिडीया कंटेंट पाहताना किंवा ऐकताना उत्कृष्ट ऑडिओ अनुभव मिळण्याची खात्री मिळते.

'इंडिया मोबाइल काँग्रेस 2026' मध्ये अनावरण


मोटोरोलाने 'इंडिया मोबाइल काँग्रेस 2026' मध्ये हा स्मार्टफोन सादर केला आणि त्याचे 'फँटम कोल स्मोक' (Phantom Coal Smoke) व 'फँटम कप्लेट ऑलिव्ह' (Phantom Couplet Olive) असे दोन रंग प्रकार (color variants) जाहीर केले. हा स्मार्टफोन आगामी काही महिन्यांत विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे; मात्र, त्याची किंमत आणि विक्रीची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES