नोकरदारवर्गाचा हिरमोड करणारी बातमी, विकेंडचा प्लान फिस्कटणार, 2027मध्ये 5 सार्वजनिक सुट्ट्या...
नोकरदार वर्गाचा हिरमोड करणारी बातमी समोर येतेय. 2027मध्ये 5 सुट्ट्या रविवारी येणार आहेत.
नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर नोकरदार वर्गाचे लक्ष जाते ते कॅलेंडरकडे. या वर्षात किती सुट्ट्या असतील त्या हिशोबाने नोकरदार वर्ग कामाचे नियोजन करण्यात येते. त्यातच सार्वजनिक सुट्टी रविवारी आली तर हिरमोड होतो. यंदा 2027मध्ये सार्वजनिक सुट्ट्यांची संख्या कमी असणार आहे.
नव्या वर्षात अनेक खगोलीय घटना घडणार आहेत. नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा, आकाशातील सुरमून, दोन सूर्यग्रहणे आणि तीन च्रंद्रग्रहणांसह अनेक खगोलीय आणि धार्मिक घडामोडींचा योग जुळून आला आहे.
2027 मध्ये पाच सार्वजनिक सुट्ट्या रविवारी, तर सात शनिवारी येणार आहेत. त्यामुळं सार्वजनिक सुट्ट्यांची संख्या कमी असणार आहे. तसंच, नव्या वर्षात सण सुमारे 10 दिवस लवकर येणार आहेत.
गणेशोत्सवाची सुरुवात शनिवार 4 सप्टेंबर 2027 रोजी होणार असून अनंत चतुर्दशी अकराव्या दिवशी येणार आहे. विशेष म्हणजे गणेश चतुर्थीच्याच दिवशी ऋषीपंचमी येणार आहे. अश्विन शुक्ल प्रतिपदा क्षयतिथी असल्याने 30 सप्टेंबर 2027 रोजी सकाळी 8.05 वाजता अमावस्या संपल्यानंतर घटस्थापना नवरात्रारंभ करावा लागणार आहे.
बाप्पाचे आगमन 10 दिवस आधीच
पुढील वर्षी गणेश चतुर्थी 4 सप्टेंबर 2027 रोजी आहे. अर्थात, गणरायाचे आगमन दहा दिवस लवकर होणार आहे. पुढील वर्षी गणेश मूर्तीचे आगमन यंदाच्या तुलनेत दहा दिवस आधी होणार आहे. अशी माहिती समोर येतेय.
पुढच्या 11 वर्षात गणपती कधी येणार?
त्यानुसार 4 सप्टेंबर 2027, 23 ऑगस्ट 2028, 11 सप्टेंबर 2029, 1 सप्टेंबर 2030, 20 सप्टेंबर 2031, 8 सप्टेंबर 2032, 28 ऑगस्ट 2033, 16 सप्टेंबर 2034, 5 सप्टेंबर 2037, 24 ऑगस्ट 2036, 12 सप्टेंबर 2037 रोजी गणेश चतुर्थी येणार आहे.