SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

भारतातील सर्वाधिक पगाराच्या सरकारी नोकऱ्या कोणत्या? मासिक वेतन ऐकून हैराण व्हाल

Highest Paying Government Job : दरवर्षी लाखो युवा हे चांगली जीवनशैली आणि आकर्षक वेतनाने प्रेरित होऊन UPSC, SSC आणि बँकिंग परीक्षेची तयारी करतात. तेव्हा भारतातील सर्वाधिक पगाराच्या सरकारी नोकऱ्या कोणत्या याविषयी जाणून घ्या.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Oct 03, 2026, 06:43 AM IST | Updated: Oct 03, 2026, 07:34 AM IST
Join

Highest Paying Government Job : सरकारी नोकऱ्या या केवळ उत्पन्नाचे स्रोत नाही तर प्रतिष्ठा, शक्ती आणि सामाजिक सुरक्षेचे सुद्धा प्रतीक आहे. दरवर्षी लाखो युवा हे चांगली जीवनशैली आणि आकर्षक वेतनाने प्रेरित होऊन UPSC, SSC आणि बँकिंग परीक्षेची तयारी करतात. तेव्हा भारतातील सर्वाधिक पगाराच्या सरकारी नोकऱ्या कोणत्या याविषयी जाणून घेऊयात.

भारतीय विदेशातील सेवा : 

जर तुम्हाला परदेशात प्रवास करण्याची आणि भारताचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा असेल तर आयएफएस (IFS) हा तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकतो. जरी त्यांचा मूळ पगार 56,100 रुपये असला, तरी परदेशातील नियुक्तीदरम्यान त्यांना परदेश भत्ता देखील मिळतो. यामुळे त्यांचा एकूण महिन्याचा पगार 2 लाख ते 3 लाख रुपयांच्या दरम्यान होतो.

आयएसएस आणि आयपीएस : 

UPSC अंतर्गत मिळणाऱ्या नोकऱ्यांमध्ये IAS आणि IPS या सर्वाधिक महत्वाच्या आणि पसंतीच्या पदांपैकी एक आहेत. यांचा सुरुवातीचा मूळ पगार जवळपास 56,100 इतका असतो, जो कॅबिनेट सेक्रेटरीच्या पदापर्यंत पोहोचल्यावर 2,50,000 पर्यंत वाढतो. पगाराव्यतिरिक्त त्यांना मोफत निवासस्थान, गाडी, कर्मचारी आणि आयुष्यभर पेन्शन यांसारख्या सुविधाही मिळतात.

आरबीआय ग्रेड बी अधिकारी : 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधील 'ग्रेड बी ऑफिसर' हे पद सर्वाधिक पगार देणारं मानलं जातं. त्यांचा सुरुवातीचा पगार 100,000 ते 1,15,000 रुपयांच्या दरम्यान असतो. त्यांना मुंबईसारख्या महागड्या शहरांमध्ये आलिशान सदनिका आणि मुलांच्या शिक्षणासाठी विशेष भत्तेही मिळतात. आरबीआय ग्रेड बी अधिकारी होण्यासाठी बँकेची परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम अधिकारी : 

GATE परीक्षा उत्तीर्ण झालेले अधिकारी ONGC, IOCL आणि NTPC सारख्या कंपन्यांकडे अर्ज करू शकतात, ज्या आकर्षक वेतन देतात. सुरुवातीचा पगार 60,000 ते 180,000 च्या दरम्यान असतो. यात बोनस, भत्ते आणि वैद्यकीय लाभांचा समावेश असतो. त्यांचा वार्षिक पगार सहजपणे 15 ते 20 लाखांपर्यंत पोहोचतो.

भारतीय सुरक्षा सेवा : 

लष्कर, नौदल आणि हवाई दलातील लेफ्टनंट किंवा त्यास समकक्ष असलेल्या पदासाठी सुरुवातीचा पगार 56,100 इतका आहे. मिलिटरी सर्व्हिस पेआणि रिस्क अलाउन्स यांचा समावेश केल्यास या मोबदल्यात लक्षणीय वाढ होते. कँटीन कार्ड्स, मोफत रेशन आणि उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधांमुळे ही नोकरी अत्यंत आकर्षक ठरते.

वैज्ञानिक  : 

भारताच्या अंतराळ आणि संरक्षण मोहिमांवर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांचे वेतन त्यांच्या पदमानानुसार वेगाने वाढते. एखादा वरिष्ठ शास्त्रज्ञ 2,00,000 रुपयांपर्यंत वेतन मिळवू शकतो. त्यांना संशोधनासाठी प्रोत्साहनपर भत्ते आणि निवासस्थानाची सुविधा दिली जाते.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES