'आमने-सामने'तून केतकी-रोहनची एक्झिट, आता नव्या जोडीची एन्ट्री, नवीन प्रयोगाची तारीखही सांगितली
मानधनवाढीचा मुद्दा उचचल्याने केतकी-रोहनच्या एक्झिटनंतर आमने-सामनेत नव्या जोडीची एन्ट्री झाली आहे.
मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय नाटत आमने-सामनेचा वाद चिघळला आहे. नाटकातील कलाकार रोहन गुजर आणि केतकी विलास यांना मानधनाच्या कारणावरुन तडकाफडकी काढण्यात आले आहे. केतकी आणि रोहन यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत तसं म्हटलं होतं. केतकी-रोहनच्या एक्झिटनंतर आता नाटकात कोणते कलाकार येणार याची उत्सुकता होती. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, आता अभिनेता तेजस राऊत आणि अभिनेत्री ऋजुता धारप ही नवी जोडी दिसणार आहे.
अभिनेता रोहन गुजर आणि अभिनेत्री केतकी विलास यांना मानधनाच्या वादावरुन नाटकातून तडकाफडकी रिप्लेस करण्यात आले होते. दोघांनीही इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत निर्मात्यांवर आरोप केले होते. '18 ऑक्टोबरला रवींद्र नाट्यमंदिरला प्रयोग झाला. त्यानंतर एक मीटिंग घेऊन आम्हाला सांगितलं की हा तुमचा शेवटचा प्रयोग. आम्हाला नीट गुडबायही करता आला नाही, आम्ही आमचा शेवटचा प्रयोग नीट एन्जॉय केला नाही, आम्हाला शेवटचा प्रयोग सेलिब्रेट करता आला नाही' असं दोघांनी म्हटलं होतं.
मात्र रोहन आणि केतकीच्या आरोपांवर नाटकाचे निर्माते आणि कलाकार लीना भागवत आणि मंगेश कदम यांनी दोघांना प्रत्युत्तर देत, तिसऱ्यांदा मागितलेली मानधनवाढ परवडणारी नसल्यामुळे आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला, असं लीना भागवत यांनी स्पष्ट केलं होतां.
आमने-सामने या नाटकातील जोडीला रिप्लेस करण्यात आले आहे. तेजस राऊत आणि ऋतुजा धारप ही नवी जोडी आता या नाटकात दिसणार आहे. ऋतुजाचे हे दुसरे व्यावसायिक नाटक आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट करत आशीर्वाद आणि पाठिंबा असू देत, असं म्हटलं आहे. त्याचबरोबर तेजस राऊत या नाटकाच्या निमित्ताने मराठी रंगभूमीवर पदार्पण करत आहे. त्यानेही इन्स्टाग्रामवर भेटुयात लवकरच आमने-सामने असं स्टोरी पोस्ट करत म्हटलं आहे. 30 ऑक्टोबर रोजी चिंचवडच्या रामकृष्ण मोरे नाट्यगृहात तेजस व ऋजुतासह 'आमने सामने'चा प्रयोग रंगणार आहे.
ऋतुजा धारप हिने अनेक मराठी मालिकांत काम केलं आहे. वर्तुळ, आई माझी काळुबाई अशा मालिकांत काम केलं आहे. तर, तेजस राऊत या गुलकंद या सिनेमात दिसला होता. तर, अलीकडे त्याने नाना पाटेकर यांच्यासोबत वनवास सिनेमात काम केलं आहे. तसंच, संकल्प या वेबसीरीजमध्येही दिसला होता.