'सेल्फी मैंने ले ली आज' या गाण्याने इंटरनेटवर धुमाकूळ घालणारी ढिंचॅक पूजा आता तिच्या आयुष्यातील एका नवीन आणि खूप खास पर्वाला सुरुवात करणार आहे. ढिंचॅक पूजाने आता नेटकऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. आपल्या अनोख्या गायनाने प्रेक्षकांची मने जिंकणारी पूजा लवकरच आई होणार आहे. तिने सोशल मीडियावर आपल्या बेबी बंपचा फोटो शेअर करत चाहत्यांना तिच्या गरोदरपणाची आनंदाची बातमी दिली. सोशल मिडियावर पोस्ट शेअर करुन पूजाने ही बातमी नेटकऱ्यासोबत शेअर केली आहे.
पूजाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या फोटोंमध्ये, अभिनेत्री तिचे बेबी बंप दाखवताना दिसत आहे. गायिकेचे हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. चाहते तिच्या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये तिचे अभिनंदनही करत आहेत. धिनचक पूजाने अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच गायक युवानसोबत लग्न केले होते आणि याबद्दलची माहिती तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरील एका पोस्टमध्ये शेअर केली होती.
हे ही वाचा
ढिंचक पूजाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर ही आनंदाची बातमी दिली. अभिनेत्रीने दोन फोटो शेअर केले आणि त्यांना 'ढिंचक पूजाचे बाळ लवकरच येत आहे' असे कॅप्शन दिले. या फोटोंमध्ये अभिनेत्री तिचे बेबी बंप दाखवताना दिसत आहे. एका फोटोमध्ये, तिने गुलाबी रंगाचा गाऊन घातला आहे आणि तिच्या हातात तिच्या मुलाचा निळ्या रंगाचा फुगा आहे. दुसऱ्या फोटोमध्ये, ढिंचक पूजाने 'आय लव्ह माय मम्मी' (I love my mummy) लिहिलेला टॅग धरला आहे. पूजाच्या पोस्टमध्ये तिच्या बेबी शॉवरची झलकही पाहायला मिळते. एका क्लिपमध्ये, तिच्या हातात 'बेबी बॉय' असे लिहिलेला फुगा दिसतो, तर दुसऱ्या क्लिपमध्ये तिच्या हातात 'आय लव्ह माय मम्मी' असे लिहिलेले स्टिकर आहे. या फुग्यामुळे बाळाच्या लिंगाबद्दल नक्कीच चर्चा सुरू झाली आहे, मात्र पूजाने अद्याप याची पुष्टी केलेली नाही.
ढिंचक पूजाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने 'दिलों का शूटर' आणि 'सेल्फी मैंने ली आज' यांसारखी गाणी गायली आहेत. त्यानंतर ती बिग बॉस 11 मध्ये दिसली, पण ती शो जिंकू शकली नाही. मात्र, ती अनेक रिॲलिटी शोमध्ये दिसली आहे.