SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

चाहते सेल्फी मागत असल्यास....; टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांचे बॉलिवूड अभिनेत्यांना निर्देश

टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर आणि अनेक सेलिब्रिटींच्या घराबाहेर संशयास्पद व्यक्ती दिसल्याच्या वृत्तांनंतर, मुंबई पोलिसांनी बॉलिवूड कलाकारांसाठी एक नवीन सुरक्षा सूचना जारी केली असून

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 10, 2026, 14:27 IST | Updated: Nov 10, 2026, 14:30 IST
Image Credit: Mumbai Police advisory
Join

अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर बॉलिवूड धास्तावले आहेत. हल्लेखोरांनी अनेक कलाकारांच्या घराबाहेर रेकी केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता पोलिसही अलर्ट झाले आहेत. मुंबई पोलिसांनी बॉलिवूड कलाकारांच्या सुरक्षेसाठी सल्ला दिला आहे. यात त्यांना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा असं सांगण्यात आले आहे.

मुंबई पोलिसांनी बॉलिवूड कलाकारांसाठी एक इशारा दिला आहे. एलीकडेच अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार करण्यात आला होता. यात अभिनेत्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नसली तरी या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. इतकंच नव्हेतर, अभिनेता रणबीर कपूर, आमिर खान, अमिताभ बच्चन यांच्या घराचीही रेकी करण्यात आली होती. म्हणूनच मुंबई पोलिसांनी खबरदारी म्हणून हा सल्ला दिला आहे.

सूत्रांनुसार, पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, जोपर्यंत परिस्थिती सामान्य होत नाही. तो पर्यंत कलाकारांनी सावध राहण्याची गरज आहे. या सूचनेनुसार कलाकारांनी गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे. चाहत्यांशी थेट संवाद आणि सार्वजनिक ठिकाणी वावरणे देखील सध्या स्थगित करण्यात आले आहे किंवा ते टाळण्याचा इशारा देण्यात आला आहे.

काही प्रमुख कलाकारांच्या घराबाहेर पाळत किंवा टेहळणी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यामुळे सुरक्षा यंत्रणांना धोक्याची सूचना मिळाली. ही बाब लक्षात घेऊन, कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी  हा खबरदारीचा उपाय योजला आहे. चित्रपटांच्या प्रमोशन इव्हेंटमध्य आणि कार्यक्रमांदरम्यान बॉलिवूडमध्ये अनेकदा प्रचंड गर्दी जमते, जिथे चाहते आपल्या आवडत्या कलाकारांना पाहण्यासाठी आणि सेल्फी काढण्यासाठी उत्सुक असतात व मोठी गर्दी करतात.

कोणत्या कलाकारांना मिळालेल्या धमक्या?

अभिनेते आयुष्मान खुराना आणि तुषार कपूर यांनाही लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने धमकीचे मेसेज आल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी बंगळूरू येथील वैभव मिश्रा या तरुणाला अटक केली आहे. तपासात असे आढळून आले आहे की, तो एका गँगचा सदस्य असल्याचे भासवून कलाकारांना धमक्या देत होता. यापूर्वी, चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर गोळीबाराची घटना घडली होती. टायगर श्रॉफ प्रकरणानंतर, अमिताभ बच्चन यांनीही आपल्या घराबाहेरील बुलेटप्रुफ काच बसवण्यात आली होती. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES