SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'रामायण' सिनेमाने रचला इतिहास! गाठला 1000 कोटींचा टप्पा, रणबीर कपूरच्या चित्रपटाने रचला नवा विक्रम

आता 'रामायण' सिनेमाने रिलीजच्या आठव्या दिवशी देखील रेकॅार्ड ब्रेकिंग कमाई केली आहे. या कमाईसह सिनेमाने अनेक सिनेमांचे रेकॅार्ड देखील मोडले आहेत.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Nov 12, 2026, 22:14 IST | Updated: Nov 12, 2026, 22:22 IST
Join

मागील काही काळापासून सातत्याने चर्चेत असलेला रामायण सिनेमा बॅाक्स ऑफिसवर बंपर कमाई करत आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने या सिनेमाची मोठ्या प्रमाणात चर्चा पाहायला मिळत आहे, आता या सिनेमाने रिलीजच्या आठव्या दिवशी देखील रेकॅार्ड ब्रेकिंग कमाई केली आहे. या कमाईसह सिनेमाने अनेक सिनेमांचे रेकॅार्ड देखील मोडले आहेत. रामायण सिनेमाने चित्रपट प्रदर्शनाच्या आठव्या दिवशी जगभरामध्ये 1000 कोटींचा टप्पा पार केला आहे. आता, तो रणवीर सिंगच्या ब्लॉकबस्टर "धुरंधर 2" च्या नावावर असलेला विक्रम मोडण्याच्या तयारीत आहे. रामायण सिनेमाच्या कमाईबद्दल सविस्तर जाणून घ्या.

रामायण बॉक्स ऑफिस कलेक्शन

रामायणच्या बॅाक्स ऑफिस कलेक्शनबद्दल सांगायचे झाले तर इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, 'रामायण भाग 1' ने भारतामध्ये आतापर्यत सर्व भाषांमध्ये आठव्या दिवशी 39.78 कोटींची कमाई केली आहे. तर चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीमध्ये 16,970 शो झाले आहेत यामध्ये 33.62 कोटींची कमाई केली आहे. तर कन्नड आवृत्तीने 2.75 कोटी तर  तर तेलुगू आणि तमिळ आवृत्तीने 1.65 कोटी रुपये कमावले. हा चित्रपट आठव्या दिवशी देशभरात 20,105 शोजमध्ये दाखवण्यात आला. या आकडेवारीनुसार, चित्रपटाची भारतातील एकूण निव्वळ कमाई 550.88 कोटींवर पोहोचली आहे, तर एकूण कमाई 657.99 कोटी झाली आहे. तथापि, हे प्राथमिक आकडे असून अंतिम कमाई जाहीर झाल्यावर त्यात बदल होऊ शकतो.

'रामायण'ने आता 1000 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला असून, असा टप्पा गाठणारा हा तिसरा चित्रपट ठरला आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की रामायणने जगभरात पहिल्याच दिवशी 128 कोटी रुपये कमावले. या पहिल्या दिवसाच्या कमाईनंतर, रामायणने आपल्या ओपनिंग वीकेंडच्या चौथ्या दिवशी 507 कोटी रुपये कमावले.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES