SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

टायगर श्रॉफच्या BMW बुलेटप्रूफ कारची किंमत किती? काय असते त्याची खासियत जाणून घ्या A To Z माहिती

अभिनेता टायगर श्रॉफच्या BMW गाडीवर रविवारी गोळीबार करण्यात आला. टायगरची कार ही बुलेटप्रूफ असल्याने त्याला कोणतीही गंभीर इजा झाली नाही. तेव्हा अशा बुलेटप्रूफ BMW गाड्यांची भारतातील किंमत किती याविषयी जाणून घ्या.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Oct 19, 2026, 02:30 PM IST | Updated: Oct 19, 2026, 03:41 PM IST
Image Credit: टायगर श्रॉफच्या ज्या BMW गाडीवर झाला गोळीबार ती किती मजबूत असते? कितीला मिळते बुलेटप्रूफ कार?
Join

Tiger Shroff Car Firing :  रविवार 18 ऑक्टोबर रोजी बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ त्याच्या आलिशान BMW कारवर गोळीबार करण्यात आला. तीन अनोळखी लोकांनी त्याच्या कारवर गोळीबार केला, यावेळी टायगर कारमध्येच बसला होता. या सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की टायगर श्रॉफला या गोळीबारात गंभीर दुखापत झाली नाही. या घटनेनंतर अनेकांना हा प्रश्न पडला की अखेर ज्या कारमध्ये टायगर श्रॉफ प्रवास करत होता ती किती सुरक्षित होती. तसेच अशा कारची किंमत किती आहे? अनेक वर्षांपासून, BMW आपल्या वाहनांच्या सुरक्षिततेवर आणि संरचनेच्या मजबुतीवर विशेष भर दिला आहे. मात्र, कोणतीही कार गोळीबारापासून किंवा बॉम्बस्फोटांपासून पूर्णपणे सुरक्षित करण्यासाठी, तिला विशेष अशा अतिरिक्त 'बुलेटप्रूफिंग'ची गरज असते. तेव्हा या टायगर श्रॉफच्या BMW गाडीबाबत जाणून घेऊयात.

BMW गाड्या किती सुरक्षित असतात?

BMW गाड्या किती मजबूत असतात याबाबत बोलायचं झालं तर बीएमडब्ल्यूच्या आलिशान गाड्या त्यांच्या अतुलनीय सुरक्षा प्रणाली आणि उत्कृष्ट बांधणीच्या गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या रचनेत उच्च-शक्तीचे स्टील, ॲल्युमिनियम आणि मजबूत संमिश्र सामग्रीचा वापर केला जातो. ज्यामुळे अपघात किंवा धडक झाल्यास गाडीतील प्रवासी बऱ्यापैकी अधिक सुरक्षित राहतात.

याशिवाय BMW गाड्यांमध्ये प्रगत एअरबॅग्ज, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, क्रॅश सेन्सर्स आणि स्टेबिलिटी कंट्रोल यांसारखी वैशिष्ट्ये असतात. तसेच थेट गोळीबारापासून संरक्षणासाठी वाहनावर विशेष आर्मर बसवणे आवश्यक  ठरते.

बुलेटप्रूफ कार बनवण्यासाठी काय करावं लागतं?

एखादी कार बुलेटप्रूफ म्हणेजच गोळीरोधक बनवली जाते, तेव्हा त्यात विविध तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.  सर्वात आधी वाहनाच्या मूळ खिडक्यांच्या जागी बहुस्तरीय बॅलिस्टिक ग्लास बसवली जाते, जी येणाऱ्या गोळ्यांचा आघात आणि वेग प्रभावीपणे निष्प्रभ करते. याशिवाय गाडीच्या बॉडी पॅनेल, दरवाजे, छप्पर आणि तळाच्या भागात केव्ह्लार, अरामिड फायबर आणि उच्च दर्जाच्या बॅलिस्टिक स्टीलचे भक्कम थर बसवण्यात येतात. तसेच या वाहनात रन-फ्लॅट टायर बसवले जातात.

कार बुलेटप्रूफ करण्यासाठी किती खर्च येतोन :

जर तुम्हाला एखादे वाहन 'बुलेटप्रूफ' करण्यासाठी त्यात मॉडिफिकेशन करायचे असेल तर  त्यासाठी येणारा खर्च आवश्यक असलेल्या संरक्षणाच्या पातळीवर अवलंबून असेल. भारतात प्राथमिक स्तरावरील कारच्या बुलेटप्रूफिंगसाठी साधारणपणे 25 लाख ते 40 लाख रुपयांपासून खर्च सुरू होतो. या स्तरावरील संरक्षणाद्वारे लहान आग्नेयास्त्रे आणि पिस्तूलच्या गोळ्यांपासून बचाव होऊ शकतो. दुसरीकडे जर तुम्हाला कारसाठी उच्चस्तरीय संरक्षणाची आवश्यकता असेल. तर त्यासाठी 50 लाख ते 1 कोटी इतका खर्च येतो या सुरक्षेनंतर AK-47 सारख्या असॉल्ट रायफल्स किंवा ग्रेनेड स्फोटांपासून सुद्धा तुमची कार वाचू शकते. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES