SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

₹9270000 कोटींचं नुकसान... काही तासात गुंतवणूकदार कंगाल; AI कंपन्यांना मोठा धक्का

सामान्यपणे जागतिक शेअर बाजारांवर अमेरिकी शेअर बाजाराचा परिणाम दिसतो. त्यामुळे मंगळवारी झालेल्या या घसरणीचा भारतीय शेअर बाजारावर काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Nov 25, 2026, 06:32 IST | Updated: Nov 25, 2026, 07:12 IST
Image Credit: एआय क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स घसरले (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य - रॉयटर्सवरुन साभार)
Join

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नावाजलेल्या कंपन्यांपैकी एक असलेल्या 'एनव्हीडिया'ची (NVIDIA) मागील काही आठवड्यांपासून जगभरात चर्चा आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक जेन्सन हुआंग यांचे कथित विवाहबाह्य संबंध, राजीनामा आणि पुन्हा त्यांची त्याच पदावर नियुक्ती या नाट्यमय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या शेअर्सनं उसळी खाल्ल्याचं दिसून आलं होतं. जेन्सन हुआंग यांची पुन्हा सीईओपदी नियुक्ती झाल्यानंतर कंपनीच्या शेअर्सनं उसळी खाल्ली असली तरी अचानक मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांनी या शेअर्सची विक्रीही सुरु झाली. एआय क्षेत्रातील प्रमुख कंपनी असलेल्या 'एनव्हीडिया'मधून गुंतवणूकदार पैसे काढून घेऊ लागल्याने सर्वच एआय म्हणजेच आर्टिफिशीएल इंटेलिजन्स क्षेत्रातील कंपन्यांना मंगळवारी अमेरिकी शेअर बाजारात मोठा फटका बसल्याचं दिसून आलं. अमेरिकन शेअर बाजारातील या अनेपक्षित घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे अवघ्या काही तासांत तब्बल ₹92,70,000 कोटींचे (92.7 लाख कोटी रुपयांचे) नुकसान झाले आहे.

पैसे काढून घेतले

चिप आणि एआय क्षेत्रातील दिग्गज कंपनी एनव्हीडिया आणि इतर एआय स्टॉक्सची मोठ्याप्रमाणात विक्री झाल्याने अमेरिकी शेअर बाजाराला घरघर लागल्याचं वृत्त 'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. मंगळवारी (24 नोव्हेंबर 2026 रोजी) अमेरिकन शेअर बाजारातील व्यवहार सुरु झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये मोठ्या प्रमाणात शेअर्सच्या विक्रीच्या माध्यमातून बाजारातून पैसा काढून घेण्यात आल्याने गुंतवणूकदारांना प्रचंड नुकसान झाले. एआय स्टॉक्समधील या विक्रीच्या दबावामुळे अमेरिकेतील प्रमुख टेक निर्देशांक असलेला 'नॅस्डॅक' (Nasdaq) 2.1 टक्क्यांनी घसरला, तर एस अँड पी 500 निर्देशांकात एका टक्क्याची घसरण नोंदवली गेली आहे. 

30 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ आणि जोरदार आपटी

एनव्हीडियाच्या संचाकल मंडळाने कंपनीचे सह-संस्थापक जेन्सन हुआंग यांनी विवाहबाह्य संबंधांच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर राजीनामा दिल्यानंतर अवघ्या 11 दिवसांत त्यांची फेरनियुक्ती केल्यानंतर कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत मोठी वाढ झाली होती. त्यामुळेच मंगळवारी झालेल्या घसरणीच्या आदल्या दिवशी म्हणजेच सोमवारी, एनव्हीडियाच्या शेअर्समध्ये 30 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली होती. जेन्सन हुआंग यांच्या फेरनियुक्तीमुळे अमेरिकी शेअर बाजारामध्ये दिसून आलेला हा उत्साह फार काळ टीकला नाही. जेन्सन हुआंग यांच्या फेरनियुक्तीमुळे कंपनीच्या शेअर्सने उसळी घेत आठवडाभरापासून सुरू असलेली बाजारातील घसरण थांबली खरी मात्र दुसऱ्याच दिवशी पुन्हा मोठ्याप्रमाणात शेअर्सची विक्री पाहायला मिळाल्याने गुंतवणूकदारांना मोठा फटका बसल्याचं दिसून आलं. 

भारतीय शेअर बाजारावर काय परिणाम?

गुरुनानक जयंतीनिमित्त मंगळवारी भारतीय बाजार बंद असल्याने, आज बाजार उघडल्यावर अमेरिकेतील या जागतिक घडामोडींचे पडसाद नक्कीच उमटतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या साऱ्याचा तात्कालिक प्रभावामुळे आज भारतीय बाजार सुरुवातीच्या सत्रात दबावाखाली असण्याची काही प्रमाणात घसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेत एआय आणि टेक क्षेत्रातील मंदी दीर्घकाळ टिकल्यास भारतीय आयटी कंपन्यांच्या ऑर्डर्सवर दबाव येऊ शकतो.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES