SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

धक्कादायक! 19 वर्षीय मुलीची आई-वडिलांकडून हत्या; गोळ्या खाऊनही मेली नाही म्हणून उशीने दाबलं तोंड, कारण त्याहून हादरवणारं, गर्भवती...

आई-वडिलांनीच आपल्या 19 वर्षीय गर्भवती मुलीची हत्या केल्याचं ऑनर किलिंग प्रकरण समोर आलं आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Nov 25, 2026, 16:30 IST | Updated: Nov 25, 2026, 16:35 IST
Image Credit: 19 वर्षीय गरोदर मुलीची आई-वडिलांकडून हत्या
Join

इराणमध्ये 19 वर्षीय गर्भवती तरुणीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा 'ऑनर किलिंग'चा प्रकार असल्याचं बोललं जात आहे. हेलिया फत्ताही (Helia Fattahi) असे मृत तरुणीचे नाव आहे. एका तरुणीसोबत ती संबंधात होती आणि त्यातून गरोदर राहिली होती. तिला दोन महिने झाले होते.  तिने गेल्या आठवड्यात ही गोष्ट आपल्या कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर संतप्त झालेल्या पालकांनी तिला बळजबरीने तिला फेफरे येण्यासाठी दिल्या जाणारी सुमारे 30 गोळ्या गिळायला लावल्य, तिला बेदम मारहाण केली आणि शेवटी उशीने तोंड दाबून तिची हत्या केली.

ही घटना इराणच्या पश्चिमेकडील सनंदाज शहरात घडली. 'इराण इंटरनॅशनल'च्या वृत्तानुसार, पोलिसांनी आरोपी पालक वोरिया फत्ताही आणि लैला वेइस (Voria Fattahi and Leila Veis) यांना आपल्या मुलीची हत्या केल्याप्रकरणी अटक केली आहे. चौकशीदरम्यान, दोन्ही पालकांनी आपली मुलगी हेलिया हिची हत्या केल्याची कबुली दिली आहे.

पालकांनी सुरुवातीला शनिवारी (२१ नोव्हेंबर) मुलीविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. घरी परतल्यावर त्यांनी तिला बळजबरीने गोळ्या गिळायला लावल्या. मात्र, ती अजूनही जिवंत असल्याचे लक्षात आल्यावर, त्यांनी उशीच्या साहाय्याने तिचा श्वास कोंडून खून केला, अशी माहिती 'हेंगाव्ह ऑर्गनायझेशन फॉर ह्युमन राइट्स'ने (Hengaw Organisation for Human Rights) दिली आहे. 'हेंगाव्ह' आणि 'हाना' या मानवाधिकार गटांनी या हत्येचे वर्णन 'ऑनर किलिंग' असे केले आहे.

"इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणने महिला आणि मुलांचे घरगुती हिंसाचारापासून संरक्षण करण्यासाठी प्रभावी कायदे न केल्यामुळे, तसेच कायद्यातील त्रुटी आणि 'ऑनर किलिंग' करणाऱ्यांना मिळणाऱ्या सौम्य शिक्षेमुळे, महिला हिंसाचाराला बळी पडत आहेत आणि यामुळे गुन्हेगारांना शिक्षा न मिळण्याची संस्कृती अधिक दृढ होत आहे," असे 'हेंगाव्ह' (Hengaw) संस्थेने म्हटले आहे.

या घटनेमुळे इराणमधील महिलांवरील अत्याचारांच्या विषयावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. फत्ताहीचा मृत्यू ही इराणमध्ये अवघ्या एका आठवड्याभरात घडलेली तिसरी अशी घटना आहे, ज्यामध्ये एका तरुणीची हत्या झाली आहे. गेल्या बुधवारी (18 नोव्हेंबर), गिलान प्रांतात 23 वर्षीय सदाफ हघबिन हिची तिच्या वाढदिवसाच्या पार्टीत एका माजी प्रियकराने गोळ्या झाडून हत्या केली; तिने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता.

त्याआधी, केर्मानशाहमधील 16 वर्षीय शालेय विद्यार्थिनी सोगंद सयादी हिचा एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. शिक्षक संघटनांच्या एका राष्ट्रीय नेटवर्कने सांगितले की, तिने शाळेतील कर्मचाऱ्यांना इशारा दिला होता की, जर तिला तिच्या वडिलांसोबत घरी पाठवले, तर ते तिची हत्या करतील.

या आठवड्याच्या सुरुवातीला, इराणी अधिकाऱ्यांनी एका प्रसिद्ध गायिका आणि तिच्या टीममधील चार सदस्यांना प्रत्येकी 74 फटक्यांची शिक्षा दिली. एका सादरीकरणाचा व्हिडिओ यूट्यूबवर लाखो वेळा पाहिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ZEENEWS TRENDING STORIES