24 तासांत कमावला भारताच्या TOP 10 कंपन्याची एकत्रीत कमाई इतका पैसा; संपत्तीत 300000 कोटींची वाढ; कंपनीचे आणि CEO चे नाव जाणून शॉक व्हाल
जेन्सन हुआंग यांचे एनव्हिडियामध्ये कमबॅक झाले आहे. जेन्सन हुआंग यांच्या कमबॅकमुळे कंपनीच्या उत्पानात वाढ झाली आहे. तर, जेन्सन हुआंग यांच्या संपत्तीत देखील वाढ झाली आहे.
Nvidia : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जगातील सर्वात दिग्गज कंपनी असलेल्या 'एनव्हीडिया'च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापकपदी पुन्हा जेन्सन हुआंग यांची नियुक्ती झाली आहे. याचे पडसाद अमेरिकेच्या शेअर बाजारात उमटले. जेन्सन हुआंग यांची पुन्हा सीईओपदी नियुक्ती झाल्यानंतर कंपनीच्या शेअर्सने मोठी उसळी घेतली. Nvidia कंपनीचे बाजार भांडवल जवळपास 3.98 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचले. एका दिवसातच कंपनीच्या बाजार भांडवलात जवळपास 1 ट्रिलियन डॉलर्सची भर पडली. कंपनीने 24 तासांत भारताच्या TOP 10 कंपन्याची एकत्रीत कमाई इतका नफा कनावला. तर, जेन्सन हुआंग यांच्या संपत्तीत 300000 कोटींची वाढ झाली.
जेन्सन हुआंग हे जगातील अव्वल अब्जाधीशांपैकी एक आहेत. जेन्सन हुआंग यांचे एनव्हिडियामध्ये कमबॅक झाले आहे. कमबॅक होताच त्यांच्या संपत्तीत एका दिवसात तब्बल 30 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. एनव्हिडियाच्या शेअर्समध्ये 30 टक्के वाढ झाल्यानंतर जेन्सन हुआंग यांच्या संपत्तीत वाढ झाली. कंपनीने एका दिवसात अंदाजे 952 ते 955 अब्ज डॉलर्स म्हणजेच अंदाजे 1 ट्रिलियन डॉलर्स) कमावले. परिणामी, कंपनीचे एकूण बाजार भांडवल अंदाजे 3.98 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचले. शेअर बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच एका कंपनीच्या बाजार भांडवलात एकाच दिवसात इतकी वाढ झाली आहे.
एनव्हिडियाच्या शेअरमधील तेजीमुळे जेन्सन हुआंग यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. फोर्ब्सच्या रिअल-टाइम बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, 24 नोव्हेंबर रोजी जेन्सन हुआंग यांची एकूण संपत्ती आदल्या दिवसाच्या तुलनेत 33.7 अब्ज डॉलर्सने म्हणजेच 3 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली. 143.8 अब्ज डॉलर्सवर पोहोचली. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनेही हुआंग यांच्या संपत्तीत एका दिवसात 30 टक्केने वाढ झाली. तथापि, मंगळवारच्या घसरणीमुळे ही वाढ काही प्रमाणात कमी झाली आहे.
जेन्सन हुआंग यांचे नाव जगातील सर्वात श्रीमंत अब्जाधीशांच्या यादीत आहे. त्यांची निव्वळ संपत्ती फोर्ब्स व ब्लूमबर्ग या दोन्ही अब्जाधीशांच्या यादीत 13 व्या क्रमांकावर पोहोचली आहे. त्यांची संपत्ती मोठ्या प्रमाणावर एनव्हिडियाच्या कामगिरीशी जोडलेली आहे. एआय (AI) उद्योगातील कंपनीच्या स्थानामुळे गुंतवणूकदारांची तिच्या शेअर्समध्ये गुंतवणूक वाढली.
जेन्सेन हुआंग यांनी 1993 मध्ये एनव्हिडियाची सह -स्थापना केली. तेव्हापासून ते कंपनीचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी ग्राफिक्स चिप उत्पादक कंपनीचे रूपांतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टीममध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रोसेसरच्या प्रमुख पुरवठादार कंपनीत केले. बाजारमूल्याच्या बाबतीत ही कंपनी जगातील सर्वाधिक भांडवली कंपन्यांपैकी एक आहे.